LatirCrime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: खळबळजनक! मामाच्या गावी आलेल्या अल्पवयीन मुलीला पळवले; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

गेल्या वीस दिवसांपासून मुलगी आपल्या मामाच्या गावी राहण्यासाठी आली होती..

दिपक क्षीरसागर

Latur News: मामाच्या गावाला राहण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना औसा तालुक्यातील मौजे वडजी येथे हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबद्दल मुलीच्या आईने भादा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही गेल्या वीस दिवसांपासून मामाच्या गावी औसा तालुक्यातील वडजी येथे राहण्यासाठी आली होती. मामाच्या गावी असताना ती अधून मधून तिच्या आईला फोन करुन बोलत असे. मात्र अचानक नातेवाईकांनी त्यांची मुलगी सापडत नसल्याचे सांगितले.

सायंकाळी सात वाजल्यापासून ही मुलगी कुठे गेली आहे माहीत नाही, ती सापडत नाही, अशी माहिती त्यांनी मुलीच्या आईला फोन करुन दिली. ज्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. मुलीच्या नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू करत सर्वत्र तपास घेतला. परंतु ती कोठेही सापडली नाही.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल...

दरम्यान, या प्रकरणाची तक्रार भादा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास सध्या पोलिस करत आहेत. (Akola News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Shastra: संध्याकाळी 'या' वेळेत घरात प्रवेश करते देवी लक्ष्मी; ही खास काम जरूर

Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर

Lagnanantar Hoilach Prem : पार्थ पुन्हा काव्याच्या गळ्यात घालणार मंगळसूत्र; डिझाइनही आहे खूप खास, पाहा VIDEO

Biryani Recipe: बासमती तांदळाची व्हेज बिरयानी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

GK : पासपोर्टचे रंग वेगवेगळे का असतात ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT