Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News In Chhatrapati Sambhajinagar : एकाचवेळी दोघांना करत होती डेट; पहिल्या प्रियकराला समजल्यावर पुढे जे घडलं ते भयानकच

आरोपींनी महिलेच्या दुसऱ्या प्रियकराची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर हा अपघात असल्याचा खोटा बनाव रचला.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथून एक मोठी बातामी समोर आली आहे. प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याने प्रियकराने त्या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली आहे. आरोपींनी महिलेच्या दुसऱ्या प्रियकराची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर हा अपघात असल्याचा खोटा बनाव रचला. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली आहे. (Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील फारोळा गावात ही घटना आहे. दरम्यान या प्रकरणी बिडकीन पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे. कनकोर टाबर चव्हाण (वय 40,रा. म्हारोळा, ता. पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव असून, विश्राम कौतुकराव गाडे, (रा. फारोळा,ता. पैठण) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

फारोळा गावातील कनकोर चव्हाण हा घरावर काम करत असताना खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला असल्याने त्याला काही लोकांनी बिडकीनच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता, त्याला मृत घोषित केले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरासे आणि गोपनीय शाखेचे कर्मचारी शिवानंद बनगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतदेहाची पाहाणी केली असता, त्याच्या अंगावर एकही जखम नव्हती. मात्र त्याचा डोक्याला मोठ्याप्रमाणावर जखमा असल्याने ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला. दरम्यान पोलिसांनी अधिक तपास केला असता, कनकोर चव्हाण याची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरासे यांनी दिली आहे.

संशियत आरोपी विश्राम गाडेचे ज्या महिलेसोबत अनैतिक प्रेम संबंध होते, त्याच महिलेसोबत कनकोर चव्हाणचे देखील सुत जुळले होते. याची माहिती मिळाल्याने विश्राम गाडेने कनकोरची हत्या करण्याचा कट रचला. तसेच शनिवारी संधी मिळताच त्याने दगडाने ठेचून कनकोर टाबर चव्हाणची हत्या केली. तसेच कोणालाही संशय येऊ नये म्हणून, घरावर काम करत असल्याचा बनाव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT