Beed News
Beed News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime News: 'तुझ्या घरच्यांनी लग्नात काहीच दिलं नाही', पतीकडून पत्नीची हत्या; बीडमधील धक्कादायक घटना

साम टिव्ही ब्युरो

Beed News : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने धारदार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या केली आहे. बीडच्या माजलगाव शहरातील भाटवडगाव परिसरात ही घटना घडली आहे.

या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा अनंत सुगडे वय 29 असं मयत महिलेच नावं आहे.

काही वर्षांपूर्वी प्रतिभा सुगडे हिचं लग्न अनंत सुगडे याच्यासोबत झालं होत. लग्नात प्रतिभाच्या घरच्यांना काही दिलं नाही यावरुन अनंत नाराज होता. यावरुन सातत्यांने दोघांमघ्ये खटके उडत असत. (Beed News)

तुझ्या घरच्यांनी लग्नात काहीच दिले नाही म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. मात्र काल पती अनंतने पत्नी प्रतिभा मारहाण करून धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले. (Crime News)

या हल्ल्यात प्रतिभा गंभीर जखमी झाली होती. माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी तिला दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मयत प्रतिभाचा भाऊ प्रथमेश प्रकाश पंडित याच्या फिर्यादीवरून आरोपी पती अनंत सुगडे विरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाईक कुटुंब नरेश म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी ठाण्यात पोहोचले

Parenting Tips: मुलांना सुट्ट्यांमध्ये फिरायला घेऊन जाताय? त्यांना आधी शिकवा महत्वाच्या गोष्टी

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT