Chhatrapati Sambhajinagar Crime News Saamm TV
महाराष्ट्र

Crime News: सोशल मीडियावर मैत्री, हॉटेलात नेऊन तरुणीवर अत्याचार; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

Chhatrapati Sambhajinagar News: ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे

Satish Daud

रामू ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime News

नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीशी एकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर तिला जेवणातून गुंगीचे औषध देऊन हॉटेलात नेलं. तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

श्रीकांत तेजराव लहाने (रा.भानुदास नगर) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाटच आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी ही शहरात नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आली होती. ती क्रांतीचौक परिसरात राहत होती. यावेळी पीडितेची आरोपीसोबत सोशल मीडियावरुन ओळख झाली. (Latest Marathi News)

दोघांचेही अधून मधून बोलणे सुरू झाले. १० मार्च २०२३ रोजी सायंकाळी पीडित तरुणीच्या मेसला सुट्टी होती. यावेळी आरोपीने तुला माझ्या घरून डबा आणून देतो असं पीडितेला सांगितलं. पीडितेने होकार देताच आरोपीने जेवणाच्या डब्यात गुंगीचे औषध टाकले. जेवण केल्यानंतर पीडितेला चक्कर आल्याने बाहेर फिरण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीला पडेगाव येथील एका हॉटेलात नेलं.

तिथे आरोपीने तरुणीवर वारंवार अत्याचार केला. याशिवाय तरुणीचे आक्षेपार्य छायाचित्रे काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारुन टाकेन अशी धमकी देखील आरोपीने तरुणीला दिली.

तू माझ्यावर केस केली तरी माझ काहीच वाकडे होणार नाही. कारण माझी बहीण एका बड्या मंत्र्याच्या घरी दिलेली आहे. ते मला वाचवतील, असा सज्जड दमही आरोपीने पीडितेला दिला. या घटनेनंतर पीडित तरुणी मानसिक तणावात गेली.

तिने घटनेबाबत कुणालाही सांगितले नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी हा तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार करीत होता. अखेर वेदना असह्य झाल्याने पीडित तरुणीने थेट छावणी पोलीस ठाणे गाठत आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही. आरोपीला लवकरात लवकर अटक करुन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तरुणीने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा स्फोट

Online Business Ideas: ५००० रुपयात सुरु करा ऑनलाइन बिझनेस; महिन्याला मिळतील लाखो रुपये

नागपूरमध्ये हलबा समाजाचं आंदोलन हिंसक, जात प्रमाणपत्रासाठी उपोषण, नेमके प्रकरण काय? VIDEO

Saturday Horoscope: मेषला आरोग्याच्या समस्या तर, या ५ राशींना मिळणार यश; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Babies constipation: थंडी वाढली की बाळांना का होतं कॉन्स्टिपेशन? तज्ज्ञांनी सांगितली कारणं आणि सोपे उपाय

SCROLL FOR NEXT