Thane News: आई-वडिलांनीच केली १८ महिन्यांच्या मुलीची हत्या, असा उघडकीस आला प्रकार

Thane Crime News: ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका दाम्पत्याने आपल्या १८ महिन्यांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गुप्तपणे स्मशानभूमीत पुरला.
Thane Crime News
Thane Crime NewsSaam tv

Thane Crime News:

ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका दाम्पत्याने आपल्या १८ महिन्यांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गुप्तपणे स्मशानभूमीत पुरला. यानंतर आता पोलिसांनी या क्रूर आई-वडिलांना अटक केली आहे.

जाहिद शेख (३८) आणि नूरमी (२८) अशी या अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे असून ते मुंब्रा येथील रहिवासी आहेत. त्यांनी १८ मार्च रोजी मुलीची हत्या केली, असं सांगण्यात येत आहे.

Thane Crime News
Dombivli News: घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करणारे रॅकेट उद्ध्वस्त, तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, ''पोलिसांना नुकतेच एक निनावी पत्र मिळाले की, या दाम्पत्याने त्यांची मुलगी लबिबाची हत्या केली आणि मृतदेह गुप्तपणे स्मशानभूमीत पुरला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि दाम्पत्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी सहकार्य केले नाही, नंतर त्यांनी हा गुन्हा कसा केला, हे सांगितलं. मात्र अद्याप त्यांनी हत्येमागील हेतू उघड केला नाही.''

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने सांगितलं की, त्यांनी १८ मार्च रोजी त्यांच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह स्थानिक स्मशानभूमीत पुरला. या दाम्पत्याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी स्मशानभूमीत मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा असल्याची माहिती समोर आली.

Thane Crime News
Nalasopara News: हृदयद्रावक! खेळता खेळता बाथरुमध्ये गेला, अन् अनर्थ घडला; १८ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, या क्रूर आई-वडिलांवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 (हत्या) आणि 201 (गुन्ह्याचा पुरावा गायब करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याला बुधवारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस.ए. दवणे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com