Dombivli News: घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करणारे रॅकेट उद्ध्वस्त, तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Dombivli Crime News: घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर रित्या गॅस चोरून कमी वजनाचे घरगुती सिलेंडर ग्राहकांना वितरित करणारे रॅकेट डोंबिवली मानपाडा पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे.
Dombivli Crime News
Dombivli Crime NewsSaam Tv

Dombivli Crime News:

>> अभिजित देशमुख

घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर रित्या गॅस चोरून कमी वजनाचे घरगुती सिलेंडर ग्राहकांना वितरित करणारे रॅकेट डोंबिवली मानपाडा पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. धक्कादायक म्हणजे ही टोळी चोरलेल्या गॅस तत्काळ कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये भरुन बेकायदेशीरपणे भरलेले कमर्शियल सिलेंडर देखील विक्री करत होते.

या प्रकरणी सापळा रचत सुजय कदम ,पप्पू मिश्रा, उत्तम बनकर या तिघांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून 35 घरगुती सिलेंडर ,9 कमर्शियल सिलेंडर अशी एकूण 44 सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा, गॅस भरण्यासाठी वापरलेला कॉम्प्रेसर पिस्टन जप्त करण्यात आलं आहे. या घटनेमुळे नागरिकांनी गॅस सिलेंडर घेताना वजन करून घेण्याचे आवाहन आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Dombivli Crime News
Nashik Crime News : मालेगाव पोलिसांची मोठी कामगिरी, नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यास सूरतमधून अटक

घरगुती सिलेंड मधून गॅस चोरीचे अनेक प्रकार याआधी देखील उघडकीस आले आहे. अनेकदा कमी गॅस असलेले कमी वजनाचे सिलेंडर ग्राहकांच्या माथी मारले जातात. घरगुती सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या रॅकेटचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांना एक टोळी विको नाका परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीर पणे काढत असल्याची माहिती मिळाली होती.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ विजय कादबाने यांनी याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनिल कुराडे यांना दिली. या चाेरट्यांना पकडण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी प्रशांत आंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले गेले. या पथकाने सापळा रचून विको नाका परिसरातील तीन तरुणांना ताब्यात घेतले. हे तीघे तरुण भारत गॅस कंपनीच्या घरगूती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून दुसऱ्या कमर्शियल बाटल्यात भरत होते. धक्कादायक म्हणजे चोरीच्या गॅसने भरलेला कमर्शियल सिलेंडर देखील विक्री करत होते.

Dombivli Crime News
Buldhana Crime News : निवडणुकीच्या धामधूमीत तहसीलदाराने घेतली 35 हजार रुपयांची लाच, सिंदखेड राजा पाेलिसांत गुन्हा दाखल

तिघांना पैकी एक सुजय कदम हा या टोळीचा म्होरक्या आहे. सुजय आधी घरगुती गॅसची डिलीव्हरी करायचा. नंतर त्याने हा गॅस चोरीचा व्यवसाय सुरु केला. त्याच्यासोबत पकडले गेलेले अन्य दोन पिंटू मिश्रा आणि उत्तम बनकर हे डिलिव्हरी करणारे आहेत. हे दोघे काम करत असलेल्या एजन्सीच्या गोडावूनमधून सिलेंडर घेऊन यायचे.

ग्राहकांना वितरित करण्याआधीच सुजय त्यांना भेटायचा आणि तो साहित्याच्या आधारे प्रत्येक घरगुती सिलेंडरमधील दोन तीन किलो गॅस चोरून कमर्शियल सिलेंडरमध्ये भरायचा. तिघे संगनमत करुन एका सिलेंडर टाकीतून २ किलो गॅस चोरी करायचे. ३५ सिलेंडर गॅसमधून प्रत्येकी दोन किलाे गॅस चोरी करुन कमर्शियल दराने विकत होते. सहा महिन्यापासून त्यांचा हा धंदा सुरु होता. हे तिघेही गॅस कंपनी आणि ग्राहकांची फसवणूक करीत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com