Nashik Police Saam Tv
महाराष्ट्र

केतकी चितळेविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल; सायबर पाेलीस करणार तपास

येत्या काही दिवसांत न्यायालयाच्या आदेशानुसार सायबर पाेलीस तिला चाैकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवरुन आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chilte) विरोधात नाशिक (Nashik) शहर सायबर पाेली स ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकीवर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून येत्या काही दिवसांत न्यायालयाच्या आदेशानुसार सायबर पाेलीस तिला चाैकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.

हे देखील पाहा -

राष्ट्रवादी महिला काँग्रेस, नाशिकच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांनी केतकीविराेधात तक्रार नाेंदविली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार (दि. १३) मे राेजी घरी असतांना फेसबुक अकाउंट चेक करत होते. त्याचवेळी केतकी चितळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून आक्षेपार्ह मजकूर लिहून त्याखाली अॅडव्होकेट नितीन भावे यांचे नाव नमूद करुन द्वेष व बदनामीकारक पोस्ट केली आहे. ही पोस्ट चितळे हिने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन केली आहे.

या बदनामीकारक पोस्टमुळे जातीय गटांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. कार्यकर्ते उद्विग्न झाले आहेत. तसेच चितळे हिने ही पोस्ट करून जातीय तेढ निर्माण हाेऊन द्वेषाची भावना, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. कालच ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून केतकीला ताब्यात घेतले आहे. आणि अत्ता नाशिकमध्ये केतकीवर गुन्हा दाखल झाल्याने येणाऱ्या काढत कितकीची मिश्किल आणखी वाढणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT