मृत रुग्ण पुन्हा जिवंत झाला ? कोल्हापूरमधील धक्कादायक प्रकार! (पहा व्हिडिओ) SaamTvNews
महाराष्ट्र

मृत रुग्ण पुन्हा जिवंत झाला ? कोल्हापूरमधील धक्कादायक प्रकार! (पहा व्हिडिओ)

आपला नातेवाईक मरण पावल्याचे समजून एका कुटुंबाने भलत्याच व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर - डॉक्टर आणि पोलिसांच्या गलथान कारभारामुळे एका कुटुंबाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. सीपीआर रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आला आहे. या ठिकाणी आपला नातेवाईक मरण पावल्याचे समजून एका कुटुंबाने भलत्याच व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून तुमचा रुग्ण जिवंत आहे असा फोन आला त्यानंतर नातेवाईकांना धक्काच बसला आहे.

ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती व्यक्ती नेमकी कोण होती हा प्रश्न अद्याप कायम आहे. सीपीआर रुग्णालयाकडून याबाबत कोणताही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सीपीआर प्रशासनाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर जोशी नगरातील रहिवासी असणाऱ्या नारायण तुदिगाल यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते.

दरम्यन, नारायण यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना रुग्णालयाकडून देण्यात आली. यावेळी संबंधित मृतदेह आपल्याच माणसाचा आहे का? याची खात्री नातेवाईकांनी केली नाही. फोनवरून ही माहिती नातेवाईकांना दिली होती. तसेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.

पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा रुग्णालयातून फोन आला तुमचा रुग्ण जिवंत आहे असे सांगण्यात आले. पण ज्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, ती व्यक्ती कोण होती, हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पोलीस आणि डॉक्टरांचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सामच्या बातमीचा इम्पॅक्ट: नीट पेपरफुटीनंतर त्या इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर होणार कारवाई, शिक्षण विभागाचे आदेश

Maharashtra News Live Update: आदिवासी बांधवाच्या जागेवर बेकायदेशीर घरकूल बांधकाम

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची घोषणा; कोण-कोणाला मिळालं तिकीट? जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावरचे डाग आणि टॅन कमी करुन ग्लोईंग चेहरा पाहिजे? रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT