Maharashtra Milk Price Hike saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Milk Price Hike: सर्वसामान्यांना फटका! गाई-म्हशीचं दूध 2 रूपयांनी महागलं; कधीपासून होणार दरवाढ लागू?

Milk Price Increase: महाराष्ट्रात ११ ऑगस्टपासून दूध दरवाढ लागू होणार आहे. गायीच्या दुधाचा दर ६० वरून ६२ रुपये, तर म्हशीच्या दुधाचा दर ७६ वरून ७८ रुपये प्रतिलिटर होणार आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य आणि दूध खरेदीच्या दरात वाढ झाल्याने दूध उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. ही दरवाढ मंगळवार म्हणजेच ११ ऑगस्टपासून लागू होणार आहे. यासोबतच विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

नवीन दरानुसार, गायीच्या दुधाचा विक्री दर प्रतिलिटर ६० रुपयांवरून ६२ रुपये तर म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ७६ रुपयांवरून ७८ रुपये होणार आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

राज्यातील सहकारी आणि खासगी डेअऱ्यांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) मध्ये झाली. संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वाढत्या उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही काळात डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांनी वाढ झाली आहे. साखरेचे दरही प्रतिकिलो १२ रुपयांनी वाढले आहेत. त्याचबरोबर पॅकिंगच्या खर्चात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून दूध खरेदीचे दरही वाढलेत. त्यामुळे दूध व्यवसायाचा एकूण खर्च वाढला असून दूध उत्पादकांवर आर्थिक ताण आला आहे.

दरवाढ का आवश्यक?

या वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी आणि दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उत्पादन, पॅकिंग, वाहतूक आणि इतर खर्च वाढल्याने ही दरवाढ करणं आवश्यक असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं.

या बैठकीला प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांचे सुमारे २० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण सिताराम चांभारे यांचा दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. तसंच अॅनालॉग पनीरवरील बंदीच्या प्रक्रियेत महत्त्वाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार विक्रम पाचपुते यांचेही यावेळी आभार मानण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: 7 तासांत पुण्यावरून बीडला पोहचा, नवीन ट्रेन सुरू; तिकीट किती अन् थांबे कुठे?

Prithvi Shaw: अवघ्या सहा महिन्यांत पृथ्वी शॉचा साखरपुडा मोडला; आकृती अग्रवाल म्हणाली, 'आमचं नातं संपलं...'

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, तर या ५ राशींना मिळेल आर्थिक लाभ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणेशोत्सवात पुण्यात ट्रॅफिकचा मोठा बदल; लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्त्यासह 'या' मार्गांवर वाहतूक बंद

Maharashtra News Live Update: सांगली भक्तीमय वातावरणात आणि पारंपारिक खेळणी गौराईचं घरोघरी आगमन..

SCROLL FOR NEXT