Dr. Hemant Gupta News Saam TV
महाराष्ट्र

Covid Center Scam: कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जे. जे रुग्णालयातील डॉक्टरांचं नाव आलं समोर

Covid Center Scam: जे जे रुग्णालयातील प्राध्यापक डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव देखील या प्रकरणी समोर आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

JJ Hospital News: कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीचं धाड सत्र सुरु झालं आहे. मुंबई महानगर पालिकेच्या कोव्हिड सेंटर घोटाळ्याविरोधात किरीट सोमय्या यांनी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अनेक पदाधिकारी आणि राजकीय नेत्यांवर कारवाई सुरु आहे. अशात जे जे रुग्णालयातील प्राध्यापक डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव देखील या प्रकरणी समोर आले आहे. (Latest Marathi News)

गुप्ता यांचे तिन्ही कक्ष बंद

ईडीच्या (ED) प्रकरणात नाव येताच त्यांच्यावर कारवाई झाली आहे. डॉ. हेमंत गुप्ता यांच्याकडे जे जे रुग्णालयातील जे युनिट होते तसेच ज्यात ते काम करत होते त्यातून त्यांना काढून टाकण्यात आलं आहे. गुप्ता यांच्यावरील सर्व पदभार देखील काढून घेण्यात आला आहे.

१५ वर्षांपासून कार्यरत

डॉ. हेमंत गुप्ता (Hemant Gupta) गेल्या १५ वर्षांपासून जे जे रुग्णालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचे गुप्ता एक भागधारक आहेत. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात गुप्ता आरोपी म्हणून समोर येताच यांच्याकडच्या सर्व कक्षा बंद केल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT