Rajesh Pawar inquiry 
महाराष्ट्र

मोठी बातमी! महाराष्ट्रातील भाजप आमदाराची चौकशी होणार, कोर्टानं दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?

BJP MLA investigation : नांदेडमध्ये भाजप आमदार राजेश पवार यांच्याविरोधात शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी न्यायालयाने कलम 156(3) अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

संजय सूर्यवंशी,नांदेड प्रतिनिधी

Court orders investigation against BJP MLA Rajesh Pawar Nanded full case details : नांदेडमधील भाजपचे आमदार राजेश पवार यांची चौकशी कऱण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. कलम १५६/३ नुसार पवार यांची चौकशी होणार आहे. शेतात येऊन जीवे मारण्याची धमकी भावाला दिली होती, त्या प्रकरणी भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या विरुद्ध कलम 156/3 नुसार चौकशी करण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहे. त्यानंतर नांदेडमध्ये खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये पवार यांच्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

राजेश पवार, त्यांची पत्नी आणि सात आठ जणांनी चुलत भावाच्या शेतात जाऊन धमकी दिली होती. 70 % अपंग असलेले चुलत भाऊ श्रीराम पवार यांना जून 2023 मध्ये आमदार पवार यांच्याविरोधात तक्रार दिली होती. शेतातबाबत दाखल असलेला दावा मागे घेण्यासाठी धमकी दिल्याची तक्रार दिली होती. फौजदारी स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा असल्याने चौकशी करण्याचे नायगाव न्यायालयाने आदेश दिले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आलुवडगांव येथील रहिवासी असलेले श्रीराम पवार हे ७० टक्के दिव्यांग आहेत. त्यांचे मौजे टेंभुर्णी (ता. नायगाव) येथील गट क्र. १७९ मध्ये शेत आहेत. त्यात त्यांनी उदरनिर्वाहासाठी बांबूची लागवड केली होती. २४ जून २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास, दोन गैरअर्जदार आणि इतर ७-८ अज्ञात व्यक्तींनी जेसीबी मशिनसह पवार यांच्या शेतात प्रवेश केला. जेसीबीच्या साहाय्याने बांबूचे पीक तोडण्यास सुरुवात केल्यावर, पवार आणि त्यांच्या पत्नीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी त्यांना धमकावत म्हटले की, "न्यायालयातील कारवाया मागे घे आणि जमिनीचा ताबा दे". इतकेच नव्हे तर, "तू आधीच एका पायाने लंगडा आहेस, तुझा दुसराही पाय तोडून टाकीन" आणि "तुम्हा दोघांना खतम करून टाकीन" अशी जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

न्यायालयीन प्रक्रियेचा प्रवासया घटनेनंतर पीडित शेतकऱ्याने पोलीस स्टेशन, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. उलट पोलिसांनी हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे सांगून हात झटकले होते. अखेर पीडिताने नायगाव न्यायालयात धाव घेतली. सुरुवातीला तांत्रिक कारणास्तव हा अर्ज नामंजूर झाला होता, परंतु जिल्हा न्यायालय बिलोली येथील फेरतपासणी अर्जानंतर हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी नायगाव न्यायालयाकडे आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा रक्तरंजित गँगवॉर; आंदेकर टोळीनं आरोपीच्या भावावर हल्ला का केला?

OBC क्रिमीलेअरची मर्यादा 15 लाख? राज्य सरकारचा केंद्राकडे नवा प्रस्ताव

Home Loan Calculator: घर खरेदीचा प्लॅन? 50000 पगारावर किती होम लोन मिळू शकतं? जाणून घ्या बँकेचं गणित...

Maharashtra Fuel Crisis: 24 तासात शेतकऱ्यांसाठी 25 टक्के पेट्रोल पंप राखीव करा; अन्यथा..., राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला इशारा

Kalyan Crime: कल्याणमध्ये भरचौकात तरुणीसोबत अश्लील वर्तन, पोलिसांनी तासाभरात आरोपीला ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT