parbhani, court, teachers saam tv
महाराष्ट्र

Parbhani : इंग्रजी विषयाची कॉपी पूरविल्या प्रकरणी सहा शिक्षकांना न्यायालयात जामीन मंजूर

पेपरचे फोटो काढून त्याच्या कॉप्या बनवत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती.

राजेश काटकर

HSC Exam 2023 : इयत्ता बारावीचा (HSC) इंग्रजी विषयाचा पेपर (HSC English Subject Paper) विद्यार्थ्यांना (students) पूरविल्या प्रकरणी साेनपेठ पाेलिसांनी (sonpeth police) सहा शिक्षकांना (teachers) अटक (arrests) केली हाेता. या शिक्षकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सोनपेठ येथील महालिंगेश्वर विद्यालयातील केंद्रावर विद्यार्थ्यास कॉप्या पुरवण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून काही शिक्षक कॉप्या बनवताना आढळले होते. यातील सहाही शिक्षकांना न्यायालयाने जामीन दिला.

उच्च माध्यमिक परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दिवशी शहरातील एका घरामध्ये विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून त्याच्या कॉप्या बनवत असल्याची माहिती मिळाली. (Maharashtra News)

यावरून सोनपेठ पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी बालाजी बुलबुले, गणेश जयंतपाळ, भास्कर तिरमले, रमेश शिंदे, सिद्धार्थ सोनाळे, कालिदास कुलकर्णी यांच्याविरुद्ध सोनपेठ ठाण्यात गुन्हा दाखल होता. यातील सहा शिक्षकांना सोनपेठ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT