New Tattoo Trend  Saam Tv
महाराष्ट्र

New Tattoo Trend : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे नाव पालकांना कळू नये म्हणून जोडप्यांची अनोखी शक्कल; चिनी-जपानी भाषेत काढले टॅटू

Tattoo Trend : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे नाव पालकांना कळू नये म्हणून चिनी, जपानी भाषेत टॅटू काढले जात आहेत.

डॉ. माधव सावरगावे

Girlfriend Boyfriend Name Tattoo : सध्या टॅटूचा तरुणांमध्ये ट्रेंड आहे. जवळपास ५० टक्के तरुण पिढी टॅटू काढत असल्याचं दिसून येत आहे. आपल्या आवडीच्या व्यक्ती, खेळाडूचे टॅटू काढण्यासोबत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे नाव काढण्याचे क्रेझ सध्या दिसून येत आहे आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे नाव पालकांना कळू नये म्हणून चिनी, जपानी भाषेत टॅटू काढले जात आहेत.

मोठ्या शहरात असणारी टॅटूची दुकाने आणि सेलिब्रिटी, इंटरनॅशनल स्तरावरचे खेळाडूच्या अंगा-खांद्यावर असणारे हे टॅटू आता गावागावातल्या तरुणी-तरुणीच्या अंगा-खांद्यावर दिसत आहे.प्राचीन काळातील गोंदवण्याचे आधुनिक रूप सेलिब्रिटीपासून ते तरुण-तरुणीमध्ये आवडत्या व्यक्तीची आठवण जोपासण्यासाठी आता मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगरात मुला-मुलींमध्ये एंजल टयू क्रॉस, पोटेंट, स्टार, मोरपंख, फिगर स्मॉल टॅटू काढून घेण्याकडे मुलींचा ओढा आहे. तर मुलांमध्ये भगवान शिव, पोर्ट्रेट, ओमची क्रेझ वाढली आहे. शिवाय बॉय आणि गर्लफ्रेंडला स्वतःच्या अंगावर गोंदवून घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

कॉलेजच्या तरुण-तरुणींमध्येही टॅटू (Tattoo) काढून घेण्याची क्रेझ आहे. टॅटू काढणे ही केवळ एक फॅशन नाही, तर आपल्या आवडत्या व्यक्तींची कायम आठवण राहावी म्हणून टॅटू काढण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे. ३० ते ३५ टक्के तरुण आवडता खेळाडू अथवा क्रीडा प्रकारानुसार बॅट, बॉल किंवा फुटबॉलचे टॅटू काढतात. मुलींमध्ये सिनेतारकांप्रमाणे स्मॉल फिंगर टॅटूची क्रेझ आहे. बॉयफ्रेन्ड- गर्लफ्रेडदेखील एकमेकांची नावे काढून घेतात. परंतु, काही जण पालकांना कळू नये म्हणून चिनी, जपानी उर्दू भाषेत टॅटू काढून घेतात.

सध्या कॉलेजात शिकणारे 50 टक्के तरुण-तरुणी हे टॅटू काढतात. तरुणांत भगवान शिव, ओम, पोर्ट्रेट, पंप पोर्ट्रेट टॅटू हात, मानेवर काढतात. वेबसिरीजच्या फ्लाइंग ईगल टॅटू कानामागे काढला जातो. पण हे टॅटू काढल्यानंतर त्याचा शरीरावर धोकाही निर्माण होऊ शकतो असं अनेकदा घडलेला आहे. त्यामुळे टॅटू काढताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकाच गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT