तिकुळी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार; तरुणांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण SaamTvNews
महाराष्ट्र

त्रिकोळी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार; तरुणांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तिकुळी येथे 14 व्या वित्त आयोगातून सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपयांची कामे झाली असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु, वास्तवात अशी कामे झालेलीच नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- कैलास चौधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तिकुळी येथे 14 व्या वित्त आयोगातून सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपयांची कामे झाली असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु, वास्तवात अशी कामे झालेलीच नाहीत. ही कामे झाली असल्याचे सांगत ग्रामसेवकांनी या मध्ये निधी उचलून खर्च केला असल्याचा आरोप करत त्रिकोळी येथील तरुणांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

हे देखील पहा :

यामध्ये दलित वस्तीमध्ये समाज मंदिरा समोर सभामंडप बांधणी, शेतकरी अभ्यास सहलीचे नियोजन करणे, अंगणवाडी दुरुस्ती करणे, सोलार पथदिव्यांच्या ऐवजी साधे पथदिवे बसविणे, शासनाकडून मंजूर केलेली कामे सर्व बदलून वेगळीच कामे करणे, तळ्यातील विहिरीचे काम अपूर्ण ठेवणे, फवारणी यंत्र खरेदी करणे, शुद्ध पेयजल करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांमध्ये अपहार झालेला आहे.

असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. तसेच या संबंधी ग्रामसेवकांनी देखील लेखी दिल्याचे सांगितले तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित ग्राम सेविकांना दहा हजार रुपये कोणतीही पावती न घेता त्या खर्च केल्याच्या कारणावरून कारवाई करण्याची नोटीसही बजावली आहे. परंतु, अद्याप यामध्ये काहीही कारवाई झाली नसल्यामुळे उपोषण करण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT