अकलूज : अकलूज जवळच्या माळीनगर येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार करताना अडचणी येत आहेत. माळीनगर (Malinagar) ग्रामपंचायतचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. येथील ग्रामपंचायतने स्मशानभूमीची (Cemetery) तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हे देखील पाहा :
येथील नीरा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी चार चौथऱ्यांची व्यवस्था आहे. त्यापैकी तीन चौथरे खराब झाले आहेत. एका चौथऱ्याच्या दगड-विटा कोसळल्या आहेत. तसेच त्यावर मोठा खड्डा पडला आहे. अन्य दोन चौथऱ्यांवर देखील खड्डे पडले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी (Funeral) सरण रचताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मातीच्या कार्यक्रमावेळी राख सावडताना हे खड्डे त्रासदायक ठरत आहेत. तीन चौथऱ्यांची दुरवस्था झाली असल्याने एकापेक्षा अधिक मृतदेहांवर (Death Body) अंत्यसंस्कार करताना चौथऱ्यांवरील खड्ड्यांमुळे अंत्यविधी नेमका कुठे करायचा, असा प्रश्न नातेवाईकांपुढे निर्माण होत आहे. स्मशानभूमीच्या वॉलकंपाऊंडचा काही भाग कोसळला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.