A farmer in Maharashtra waits for relief as corruption clouds government aid. Saam Tv
महाराष्ट्र

अवकाळीच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला, भ्रष्ट अधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नाही सोडलं

Corruption In Unseasonal Rain: अतिवृष्टीने पिचलेल्या बळीराजाला आता सुल्तानी कारभाराचेही फटके बसत आहेत. सर्व गमावून बसलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात शासनाकडून मदतीचे पैसे जमा होत आहेत. मात्र भ्रष्ट सरकारी बाबू या मदतीवरही डल्ला मारत आहेत.

Girish Nikam

अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडालाय. होत्याचं नव्हतं झालं. अस्मानी संकटानंतर खचलेल्या बळीराजाला आधार देण्याची गरज असताना सरकारी भ्रष्ट बाबू स्वताची तुंबडी कशी भरतायेत त्याचं उदाहरण समोर आलंय. .

पंचनामे करणारे अधिकारीच शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत. त्यासंदर्भातली एक ऑडिओ क्लिप समोर आलीय. शासकीय कर्मचाऱ्याकडून पैशाची मागणी होत असल्याचं आरोप होतायत. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील पेठमुक्तापूर इथला हा प्रकार असल्याचं बोलल जातंय. मात्र व्हायरल ऑडिओ नेमका कुणाचा आहे याची माहिती समजू शकलेली नाही. साम टीव्ही या ऑडिओची कुठलीही पुष्टी करत नाही.

राज्य सरकारने जून ते सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकूण सुमारे २,५४० कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. या निधीमध्ये आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे आणि इतर खर्चांकरिता १,७६५ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज समाविष्ट आहे. मात्र हे पूर्ण पैसे बळीराजापर्यंत पोचतील का ? ही शंका आहे. बळीराच्या ताटातलंही ओरबाडून खाणा-या भ्रष्ट अधिकारी, कर्मचा-यांची हाव कधी संपणार ? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai School News : हातावर मेहंदी काढली म्हणून १५ ते २० मुलींना काढले वर्गाबाहेर, मुंबईतील शाळेचा धक्कदायक प्रकार!

रूग्णालयात हॅकर्सची नजर; महिलांचे खासगी व्हिडिओ लीक, हजारो क्लिप पॉxxx साईटवर अपलोड

द्राक्ष पंढरीत खळबळ! शेतकरी बागेत फिरायला गेला आणि... काही क्षणांत घेतलं विष|VIDEO

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, भाजपला धक्का, हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT