लातुरात अवैध बांधकामावर मनपाचा हातोडा, आयुक्त मित्तल यांची कारवाई दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

लातुरात अवैध बांधकामावर मनपाचा हातोडा, आयुक्त मित्तल यांची कारवाई

लातूर शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका सरसावले महानगरपालिकेच्या वतीने उद्योग भवन परिसरामध्ये मोठी कारवाई अवैध बांधकाम करून अतिक्रमण केलेले दुकाने या सर्वांवर बुलडोजर चढवून आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महानगर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर Latur शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका Municipal Corporation सरसावले महानगरपालिकेच्या वतीने उद्योग भवन परिसरामध्ये मोठी कारवाई अवैध बांधकाम करून अतिक्रमण केलेले दुकाने या सर्वांवर बुलडोजर चढवून आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महानगर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यावेळी स्वतः मनपा आयुक्त अमन मित्तल Aman Mittal उपस्थित होते.

हे देखील पहा-

लातूर शहरातल्या विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh मार्गावर अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी अतिक्रमण करत अनधिकृत बांधकामे केली होती. यावर लातूरच्या महानगरपालिकेच्या वतीनं सदरची बांधकामे नियमित करून घेण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. पण अनेक नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले आज महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमन केलेल्या जागेमध्ये असलेल्या दुकानांवर कारवाई करत बुलडोजर चढवले. तर काही दुकान व व्यापारी प्रतिष्ठान यांच्या इमारतीला 15 दिवसाची मुदत देऊन सील करण्यात आली आहेत.

शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांच्या पुढाकाराने आज शहरातील विलासराव देशमुख मार्गावर अतिक्रमण मध्ये असलेल्या दुकानांवर बुलडोजर चढवून कारवाई करण्यात आली. यात खाजगी कोचिंग क्लासेस किराणा दुकान दवाखाना आदी व्यवसाय या अतिक्रमण केलेल्या इमारतीत सुरू होती. यामुळं अतिक्रमण धारकात मोठी भीती निर्माण झाली आहे. तर लातूर शहर पुन्हा एकदा अतिक्रमण मुक्त होऊन मोकळा श्वास घेईल अशी आशा आता नागरिकांमध्ये आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AAP MLA : आप आमदाराला कोर्टाचा दणका; तरुणीला मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी ठरवलं दोषी; फैसला कधी?

घरात मृत व्यक्तीचा फोटो कुठे लावावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या

Himachal Flood : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, ३७० जणांचा मृत्यू, ४३४ जण जखमी आणि ६१५ रस्ते बंद

Banjara Community : आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा

Kitchen Hacks : भात शिजल्यावर चिकट होतो? आताच टाळा 'ही' चूक

SCROLL FOR NEXT