Corona Wave: MSRTC ने लाल परी संदर्भात घेतला महत्वाचा निर्णय Saam Tv
महाराष्ट्र

Corona Wave: MSRTC ने लाल परी संदर्भात घेतला महत्वाचा निर्णय

राज्य परिवहन महामंडळाने राज्यात कोरोनाचा धोका टाळण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि राज्याचे आरोग्य विभाग पूर्व तयारी करत आहे. यासोबतच आता राज्य परिवहवन महामंडळ MSRTC सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेत आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून बसेसवर विशेष रसायनांची फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता एमएसआरटीसी मंडळ आपल्या जवळपास १० हजार बसेसवर अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग Antimicrobial chemical layer करण्यात येणार आहे.

हे देखील पहा-

या निर्णयानुसार एसटी वर म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर तसेच या बसेसच्या आतील भागात सुद्धा रसायनांची फवारणी करण्यात येणार आहे. या रसायनाच्या फवारणीमुळे कोणत्याही प्रकारचा विषाणू, रोग पसरवणारा जंतू गाडीवर आणि गाडीच्या आतमध्ये राहणार नाही. अनेक कार्यालये आणि एअरलाईन्समध्ये अशा प्रकारच्या रसायनिक फवारणींचा उपयोग करण्यात येतो.

एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष शेखर चन्ने Shekhar Channe यांनी याबद्दल अधिक माहिती दिली की, "कोरोना महामारीमुळे आणि त्याच्या फैलावामुळे अनेक नागरिक सार्वजनिक परिवहनचा उपयोग करणं तळताना दिसत आहे. त्यामुळे हा फवारणी करण्याचा निर्णय एसटी प्रवाशांमधील भीती नक्कीच दूर करण्यास मदत करेल."

अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग यस्टी बसेस वर करण्यात येणार आहे. ही रासायनिक फवारणी बसेसच्या खिडकी, सीट, चालकाची केबिन, दरवाजे यासोबतच प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या भागात केली जाणार आहे. या संदर्भातील प्रक्रियेसाठी मे महिन्यात निविदा काढण्यात आलेल्या होत्या. या प्रक्रियेसाठी दोन कंपन्या पुढील आठवड्यात या सुरुवात करणार आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT