उद्यापासून 5 नियमांत मोठे बदल; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ

या नव्या नियमांनुसार त्यानुसार बल्क पेमेंट सिस्टम आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असणार आहे.
उद्यापासून 5 नियमांत मोठे बदल; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ
उद्यापासून 5 नियमांत मोठे बदल; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळSaam Tv
Published On

नवी दिल्ली - एक ऑगस्ट २०२१ पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल केले जाणार आहे. यामध्ये एटीएम ATM मधून पैसे काढणे, पगार आणि एलपीजी गॅसच्या LPG Gas शुल्काचाही समावेश असणार आहे. नव्या नियमांमध्ये रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेक बुकच्या मर्यादेतही सुधारणा करण्यात आली आहे. एक ऑगस्टपासून August यावर शुल्क आकरण्यात येणार आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

वेतन-पेन्शन सुट्टीच्या दिवशीही मिळणार

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून सुट्टीच्या दिवशी देखील खात्यात वेतन आणि पेन्शन जमा होणार आहे. तशा सूचना आरबीआयकडून जारी करण्यात आल्या आहेत. या नव्या नियमांनुसार त्यानुसार बल्क पेमेंट सिस्टम आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असणार आहे.

हे देखील पहा -

एटीएममधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क लागणार

नव्या नियमांनुसार, आता ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएममधून महिन्याला फक्त पाच मोफत ट्रान्झॅक्शन करु शकतो. पाच मोफत ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क याआधी १५ रुपये होते ते आता १७ रुपये करण्यात आले आहे. तर सर्व बिगर वित्तीय व्यवहारांवरील शुल्क हे ५ रुपयांवरून ६ रुपये इतके करण्यात आले आहे. उद्यापासून म्हणजेच १ ऑगस्ट २०२१ पासून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या नियमांत बदल

आयसीआयसीआय बँकेच्या नियमांत देखील बदल केले जाणार आहे. या नव्या नियमांनुसार रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेक बुकच्यामर्यादेत देखील सुधारणा करण्यात आली आहे. उद्यापासून यावर शुल्क आकारले जाणार आहे. माहितीनुसार, नियमित बचत खाते असलेल्या ग्राहकांना दरमहा चार मोफत व्यवहारांची सुविधा मिळणार असून त्यानंतर ग्राहकांना प्रति व्यवहार १५० रुपये आकारले जाणार आहे.

उद्यापासून 5 नियमांत मोठे बदल; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ
कमलप्रीत कौरनं रचला इतिहास; डिस्कस थ्रोमध्ये भारताचं पदक निश्चित

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके मध्येही बदल

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने देखील आपल्या नियमांत काही बदल केले आहेत. १ ऑगस्ट २०२१ पासून हे नियम लागू करण्यात येणार आहे. या नव्या नियमांनुसार आता घरपोच सेवांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. आतापर्यंत यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नव्हते पण आता मात्र ग्राहकांना प्रत्येक घरपोच सेवेसाठी २० रुपयांचे अधिक जीएसटी द्यावे लागणार आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार इंधन कंपन्यांद्वारे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल केले जातात. उद्यापासून पासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यात एलपीजी सिलेंडर बुकिंग करण्यापूर्वी एकदा एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत तपासा आणि नंतर बुकिंग करा.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com