Bhandara Corona Saam TV
महाराष्ट्र

सावधान! भंडारा जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; तब्बल 2 महिन्यानंतर आढळला रुग्ण

जिल्ह्यात दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

अभिजित घोरमारे

भंडारा : मागील काही महिन्यांपासून कमी झालेली कोरोना (Corona) रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. अशातच भंडारा (Bhandara) जिल्ह्यात दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. (Corona Virus Latest News In Bhandara)

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या आठवड्यात लाखांदूर येथील व्यक्ती कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, दोन नवीन रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता दोनवर पोहचली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जिल्ह्यात 7 हजार 802 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते, त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला, तर 7 हजार 790 व्यक्तींनी कोरोनावर मात केली होती. आता तिसरी लाट ओसरल्यानंतर नागरिक बेजबाबदारपणाने वागत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT