Good News: घोडेझरी ठरले भंडारा जिल्ह्यातील पहिले लसवंत गाव
Good News: घोडेझरी ठरले भंडारा जिल्ह्यातील पहिले लसवंत गाव Saam Tv
महाराष्ट्र

Good News: घोडेझरी ठरले भंडारा जिल्ह्यातील पहिले लसवंत गाव

अभिजीत घोरमारे

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) लाखनी तालुक्यातील घोडेझरी या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी लस घेवून जिल्ह्यातील पहीले लसवंत गाव होण्याचा बहुमान पटकाविला आहे. गावातील सर्व 941 लाभार्थ्यांनी लस घेतली असून शंभर टक्के लसीकरण झालेले भंडारा जिल्ह्यातील पहीले गाव ठरले आहे. लसीकरणाच्या जागरूकतेबाबत जिल्हाधिकारी संदिप कदम यांनी नागरीकांचे कौतुक केले आहे.

या सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर घोडेझरी येथे लसीकरणाचे चार कॅम्प घेण्यात आले व सर्व ग्रामस्थांचे पहिल्या डोसचे लसीकरण करून घेण्यात आले. प्रत्यक्ष लसीकरण कॅम्पच्या दिवशी, डाटा एन्ट्री करण्यासाठी चार व्यक्तींची नेमणूक, उमेद महिला बचतगटाच्या महिलांची मदत, शिक्षकांच्या द्वारे केलेली प्रचार प्रसिद्धी, आरोग्य विभागाद्वारे लसी व अनुषंगिक बाबींचा योग्य पुरवठा, या सर्व बाबींमुळे सर्व पात्र ग्रामस्थांना लसीचा पहिला डोस देणे शक्य झाले.

घोडेझरीची लोकसंख्या 1054 असून पात्र लाभार्थ्यांची संख्या 941 ऐवढी आहे. या सर्व व्यक्तींनी कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतला तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 670 असून 271 नागरीक त्यांच्या वेळापत्रकानुसार दुसरा डोस घेणार आहेत. घोडेझरी ग्राम पंचायतीने कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत चांगली प्रसिद्धी केल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पहीले लसवंत गाव ठरले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

Hot Water Benefits: जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे काय?

Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

IPL 2024 Playoffs: CSK चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी करावं लागेल हे काम

Anuj Thapar News : "अनुज थापरची आत्महत्या नाही तर हत्या...", कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT