corona-jn1-virus 3 patients found in Nashik mumbai pune thane maharashtra covid cases Saam Tv
महाराष्ट्र

JN.1 Covid Cases: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली, नाशिकमध्ये आढळले ३ नवे रुग्ण; राज्यभरात काय परिस्थिती?

Maharashtra JN.1 Covid Cases: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं आहे. रविवारी नाशिकमध्ये जेएन.१ व्हेरिएंटचे ३ नवे रुग्ण आढळून आले आहेत

Satish Daud

JN.1 Covid Cases in Maharashtra

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं आहे. रविवारी नाशिकमध्ये जेएन.१ व्हेरिएंटचे ३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील एका रुग्णाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर दोन रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आलंय. शहरात कोरोनाचे ३ नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकांनी सतर्कता बाळगावी, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी राज्यात कोरोना व्हायरसचे १३१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची सक्रिय संख्या ७०१ इतकी झाली आहे. तर जेएन.१ व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा २९ वर गेला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण ठाण्यात आहेत. ठाण्यातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या १९० इतकी आहे.

दुसरीकडे मुंबईत आतापर्यंत १३७ आणि पुण्यात १२६ रुग्णांना कोरोनाची लागण जाली आहे. कोरोनाला लगाम लावण्यासाठी महाराष्ट्रात एक नवीन टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला आहे. याचे नेतृत्व ICMR चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर करत आहेत. या टास्क फोर्समध्ये ७ सदस्य आहेत.

दरम्यान, रविवारी देशात कोरोनाचे ८४१ नवीन रुग्ण आढळले. गेल्या ७ महिन्यांतील एका दिवसातली ही सर्वाधिक आकडेवारी आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. ख्रिसमस आणि नववर्षानिमित्ताने होणारी गर्दी वाढल्याने रुग्णसंख्या वाढल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT