नंदुरबारमधील दशामाता उत्सवावर कोरोनाचे सावट दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबारमधील दशामाता उत्सवावर कोरोनाचे सावट

दशामाता मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावर्षी ग्राहकांची मागणी मंदावली असून, रंगांच्या व इतर वस्तूंच्या किंमती वाढल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - दशामाता (dashamata) मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावर्षी ग्राहकांची मागणी मंदावली असून, रंगांच्या व इतर वस्तूंच्या किंमती वाढल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दशामातेचा उत्सव हा मूळच्या गुजरात राज्यातील असला तरी नंदुरबार जिल्हा (nandurbar district) सीमावर्ती भाग असल्यामुळे गेल्या बारा ते पंधरा वषार्पासून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. येत्या 8 ऑगस्टला मातेची स्थापना करण्यात येणार असून कारागिरांनी मूर्ती साकारण्याला वेग दिलेला आहे. (Corona fear at Dashamata festival in Nandurbar)

हे देखील पहा -

शहरात तीन ते चार कारागिरांकडून मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. अहिल्याबाई विहिर समोर असलेले कारागीर परेश सोनार व सागर सोनार यांनी गेल्या 4 ते 6 महिन्यांपासून मूर्ती बनवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्याकडे एक फुटापासून ते साडे पाच फुटा पर्यंत मूर्ती आहेत. प्रत्येक मूर्तीचा दर वेगवेगळा आहे. 100 रु. पासून तर 5000 रु. पर्यंत मूर्तींची किंमत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ग्राहकांची मागणी मंदावलेली आहे. गुजरात व मध्य प्रदेशातून देखील मूर्ती खरेदी करण्यासाठी भाविक मोठया प्रमाणात येत असतात, परंतु दोन वर्षांपासून तेथील भाविक येत नसल्याने 40% ते 50 % मूर्ती आता पर्यंत बुकिंग झाल्या आहें असे मूर्तिकार सागर सोनार यांनी सांगितले.

सध्या कारागिरांकडून आता मूर्तींना रंग-रंगोटी देण्याचे काम सुरू आहे. काम जवळजवळ अंतिम टप्प्यात आले आहे. मूर्ती जास्तीत जास्त आकर्षक बनविण्यासाठी कारागिर अजून वेगवेगळ्या आकाराचे शोभिवंत आभूषणांचा साज मूर्तीवर चढविण्यात येत आहे. अशा साजालाही मोठी मागणी असते. मात्र कोरोनामुळे यंदा मागणी कमी झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

Maharashtra News Live Updates: कल्याण पश्चिम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखाेर उमेदवार अरविंद मोरे यांची माघार

SCROLL FOR NEXT