Corona : कोरोना नियमांना हरताळ; 'शाही' लग्नसोहळ्यावर कारवाई!
Corona : कोरोना नियमांना हरताळ; 'शाही' लग्नसोहळ्यावर कारवाई! रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

Corona : कोरोना नियमांना हरताळ; 'शाही' लग्नसोहळ्यावर कारवाई!

Krushnarav Sathe

जुन्नर : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम सखाराम लांडे यांनी कोविड काळात नियम मोडून मुलाच्या लग्नात 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवली म्हणून नवरदेवाचे वडील,सासरे व मंगल कार्यालय मालक यांच्यासह अन्य 6 जणांवर जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

हे देखील पहा -

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी बारव येथे झालेला हा शाही लग्नसोहळा दोन दिवस मोठा चर्चेत होता.अनेक राजकीय मंडळी आजी माजी आमदार,आजी माजी सदस्य या लग्नसोहळ्याला उपस्थिती होते.जुन्नर,अकोला,ठाणे येथील आमदार सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते.बारव येथील महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, देवराम सखाराम लांडे, बाळू सखाराम लांडे, एकनाथ सिताराम कोरडे ( रा.माणकेश्वर ) व चैतन्य उल्हास मिंडे ( रा.तांबे ता.जुन्नर जि.पुणे व सुधीर नामदेव घिगे (रा. दुधनोली ता.मुरबाड जि.ठाणे) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

28 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2 च्या सुमारास मौजे , बारव गावचे हद्दीत कडे जाणाऱ्या रोडवर महालक्ष्मी मंगल कार्यालय इथे हा लग्न सोहळा पार पडला.याबाबतची फिर्याद पोलीस अंमलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली असून गुन्हा रजि.नं - 325/2021 नुसार भा.द.वि. कलम 188,269,270 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

28 तारखेस यातील आरोपी यांनी त्यांचे लग्नाचे कार्यक्रमास मर्यादेपेक्षा जास्त 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमलेली होती महाराष्ट्रात तसेच सध्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना या विषाणूंचा संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहे या विषाणूंचा प्रादुर्भाव चालू आहे हे माहीत असुन तसेच जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील सदर ठिकाणी आरोपी यांनी जमाव जमवून गर्दी केली आहे म्हणून जुन्नर पोलीसांनी ही कारवाई केली असून जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास जाधव पुढील तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shekhar Suman : शेखर सुमन यांचा भाजप प्रवेश; कंगना रणौतचा प्रचार करणार का?

Live Breaking News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Loksabha Election: उत्सव लोकशाहीचा! सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी; 'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्का; PHOTO

Nagpur News : महिलेचा मोबाईल नंबर घेण्यासाठी लावली ५० हजाराची पैज; तिघे मित्र पोलिसांच्या ताब्यात

PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT