Sant Yuvraj On Saibaba Saam Tv
महाराष्ट्र

Saibaba: साईबाबांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, 'तलवारवाला बाबा'विरोधात गुन्हा; शिर्डीत नागरिक संतप्त

Sant Yuvraj On Saibaba: साईबाबांबाबत तलवारवाला बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे साईभक्त संतप्त झाले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा केला जात आहे.

Priya More

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

तलवारवाला बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशभरातील हिंदू मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या तलवारबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज महाराज यांनी नुकताच साईबाबांबाबत वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. देशभरातील हिंदू मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 'काही हिंदू मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्ती आहेत. देशभरात ठिकठिकाणी साईबाबांची मंदिरं आहेत. सगळीकडे गल्ली गल्लीत साईंची मंदिरं आहेत. हिंदुंना काय झाले आहे. जुलैमध्ये या सर्व साईबाबांच्या मूर्ती हटवून टाका.'

तसंच, 'साईबाबांच्या मूर्तींना हातोड्याने तोडून गटारामध्ये टाका. नदीमध्ये मूर्ती टाकून ती परत मिळेल असं करू नका. प्रत्येक मंदिरातून या मूर्ती हटवला. जर तुम्ही मूर्ती हटवल्या नाही तर आम्ही जबरदस्ती त्या हटवू. हे अभियान आम्ही फरिदाबाबमधून सुरू केले आहे. साईबाबा मुस्लिम होते ते मांसाहारी होते आणि व्यभिचारी होते. साईबाबा देव नाही. त्यांच्याशी आपला काहीच संबंध नाही.', असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.

संत युवराज यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. साईबाबा संस्थानकडून शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. साईबाबांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. व्हायरल व्हिडिओनंतर शिर्डीत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: ड्रग्ज देऊन चौघांकडून सामूहिक बलात्कार, तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनीही अब्रु लुटली अन् ₹५००००..., थरकाप उडवणारी घटना

बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याविरूद्ध कोट्यवधींच्या फसवणुकीचा गुन्हा, म्हणाले, 'पोलिसांना दिशाभूल केली...'

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी...

मध्यरात्री लोकलमध्ये डॉक्टरचा पाठलाग; अश्लील हावभाव अन्.. नवी मुंबईतील आरोपीला बेड्या

South Indian Appam : नाश्त्याला घरीच बनवा १० मिनिटांत अप्पम, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT