Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी नेपाळसारखं नेत्यांना तुडवावं लागेल, तुपकार यांचं वादग्रस्त विधान

Akola News : अकोल्यात झालेल्या 'शेतकरी लूट वापसी संवाद सभेत' बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांच्या वादग्रस्त विधानांनी खळबळ उडाली आहे. राकेश टिकैत यांनी मात्र शेतकऱ्यांना जमीन विकू नका असे आवाहन केले.

Alisha Khedekar

  • अकोल्यात पार पडलेल्या 'शेतकरी लूट वापसी संवाद सभेत' नेत्यांची भाषणे गाजली

  • बच्चू कडू यांनी 'कलेक्टरलाच तोडू' असे वादग्रस्त विधान केले

  • रविकांत तुपकरांनी 'शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी मंत्र्यांना तुडवा' असे आक्रमक वक्तव्य केले

  • राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना जमीन विकू नका असे आवाहन केले

अकोल्यात 'किसान ब्रिगेड'च्या वतीने 'शेतकरी लूट वापसी संवाद सभा' पार पडली. ही सभा गाजली ती 'प्रहार'चे नेते बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वादग्रस्त विधानांनी. या सभेसाठी देश आणि राज्यातील शेतकरी नेते अकोल्यात आले होते. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत, बच्चू कडू, रविकांत तूपकर, प्रकाश पोहरे, अजित नवले, विश्वास उटगी आदी नेते या सभेला उपस्थित होतेय.

या सभेत बोलताना 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या जळगाव येथील आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला. "जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडलं. यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू " असा वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी दिला.

याच सभेत बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी थेट 'जेन-झी' आंदोलनादरम्यान नेपाळमधील घटनेचा उल्लेख केला. "यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी थेट मंत्र्यांना तुडवावं लागेल.‌ दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय व्यवस्था जागी होणार नाही" असं वादग्रस्त विधान रविकांत तुपकरांनी केलं. तर, 'भारतीय किसान युनियन'चे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकू नका असं आवाहन केलं आहे. अकोल्यातील बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांच्या विधानांनी राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या सभेतील वादग्रस्त विधानांनी राज्यात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. विशेषतः बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांच्या भाषणातील आक्रमक शब्दप्रयोगामुळे राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठली आहे. दरम्यान या आंदोलनानंतर शेतकरी प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास राज्यात आणखी तीव्र आंदोलन पेट घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! आणखी १७५०० महिलांचे अर्ज बाद; कारण काय?

Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन, शिळफाटा बोगद्याचं काम पूर्ण, Inside फोटो पाहा

Pachora News : आत्यासोबत नदीवर गेलेली मुलगी नदीत पडून बेपत्ता; धक्क्याने आजोबांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: - शरदचंद्र पवार गटाकडून पडळकरांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध

Manchurian Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ग्रेव्ही मंच्युरियन, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT