Washim News  Saam Tv
महाराष्ट्र

Washim News : वाशिममध्ये दूषित पाण्याचा पुरवठा; 50 हून अधिक जण आजारी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Contaminated water Supply At Washim: वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे दूषित पाणीपुरवठा झाला आहे. यामुळे 50 हून अधिक जण आजारी पडले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल, साम टीव्ही, वाशिम प्रतिनिधी

वाशिममधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे दूषित पाणीपुरवठा झाला आहे. यामुळे 50 हून अधिक जण आजारी पडले आहेत. त्यांना उलटी, मळमळचा त्रास सुरू झाल्याने अचानक अनेकजण आजारी पडले.

अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काही रुग्णांना जास्त त्रास जाणवत असल्याने त्यांना अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे नळ योजनेद्वारे गावात पाणीपुरवठा होतो. मात्र काही दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर पाणीपुरवठा पुर्ववत करण्यात आला. पाईपलाईनच्या लिकेजमधून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा झाल्यानं, दूषित पाणी प्यायल्याने उलटी, मळमळचा त्रास उद्भवला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते.

अचानक गावातील अनेकांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने वाशीम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावातील पाईपलाईन नादुरुस्त असल्यामुळे दूषित पाणी पिण्यास आल्याने अनेकांना त्रास उद्भवला असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णांची तब्येत स्थिर असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

मात्र या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT