बांधकाम मजुराची हत्या; पोत्यात भरून मृतदेह रस्त्यावर फेकला, अनैतिक संबंधातून हत्या केल्याचा अंदाज Saam TV
महाराष्ट्र

बांधकाम मजुराची हत्या; पोत्यात भरून मृतदेह रस्त्यावर फेकला, अनैतिक संबंधातून हत्या केल्याचा अंदाज

सदरचा मृतदेह मृतकाच्या घरापासून अगदी 50 मीटर अंतरावर पोत्यात भरून मृतदेह फेकण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून दूर फेकण्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला पण वजन जास्त असल्याने मृतकाच्या घरापासून अवघ्या पन्नास मीटरवरती मृतदेहचे पोते ठेवून आपोपीनी पळ काढला.

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा : आष्टी शहीद शहरातील नवीन वस्ती परिसरात आज सकाळच्या सुमारास नागरिकांना पोत्यात बांधून असलेला मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह ज्या पोत्यामध्ये होता त्या पोत्याचा काही भाग फाटला असल्याने हा मृतदेह नागरिकांना दिसला.

हा मृतदेह अशा पद्धतीने सापडल्याने आष्टी (Ashti) शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह बांधकाम मजुराचा असून मृतकाचे नाव जगदीश भानुदास देशमुख असे आहे . नेमकी हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली असावी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी केली असून पोलीसही घटनास्थळी दाखल होत त्यांनी त्या मृतदेहाता पंचनामा सुरु केला आहे.

सदरचा मृतदेह मृतकाच्या घरापासून अगदी 50 मीटर अंतरावर पोत्यात भरून मृतदेह फेकण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून (Immoral relationship) हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून दूर फेकण्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला पण वजन जास्त असल्याने मृतकाच्या घरा पासून अवघ्या पन्नास मीटरवरती मृतदेह असणाऱे ठेवून आरोपींनी पळ काढला असावा असा कयास लावला जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maa Music Video: मातृत्वाच्या भावना साजऱ्या करणारं नवं गाणं प्रदर्शित; तुलसी कुमारची गीत झरीन यांना श्रद्धांजली

Maharashtra Live News Update : 15 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू

Janhvi Kapoor: बॉलिवूडची 'अप्सरा' जान्हवी कपूरच्या सौंदर्याने लावले चार चाँद, Photo

Pimpri Chinchwad News : चित्रपट निर्मात्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक; धक्कादायक कारण समोर

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाने उभ्या वाहनांना उडविले, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT