बंडातात्या कराडकरांच्या प्रकरणावरती तृप्ती देसाई म्हणाल्या; हा तर राजकीय महिलांचा दुटप्पीपणा
बंडातात्या कराडकरांच्या प्रकरणावरती तृप्ती देसाई म्हणाल्या; हा तर राजकीय महिलांचा दुटप्पीपणाSaam TV

बंडातात्या कराडकरांच्या प्रकरणावरती तृप्ती देसाई म्हणाल्या; हा तर राजकीय महिलांचा दुटप्पीपणा

राजकीय महिला नेत्यांचा दुटप्पीपणा कळाला, मागील एका कीर्तनकाराने वारंवार कीर्तनामध्ये महिलांचा अपमान केला होता तो अनवधानाने नव्हताच तेव्हा महिलांचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा या महिला नेत्यांना दिसली नव्हती का?

पुणे : बंडातात्यांनी (BandaTatya Karadkar) केलेले वक्तव्य संतापजनकच पण हे प्रकरण त्यांनी माफी मागितल्यामुळे इथेच थांबले पाहिजे, हे प्रकरण वारंवार चर्चेत राहिले तर राजकीय महिला नेत्यांची जास्त बदनामी होणार आहे. अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या (Bhumata Brigade) संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी दिली आहे.

राजकीय महिला नेत्यांचा दुटप्पीपणा कळाला, मागील एका कीर्तनकाराने वारंवार कीर्तनामध्ये महिलांचा अपमान केला होता तो अनवधानाने नव्हताच तेव्हा महिलांचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा या महिला नेत्यांना दिसली नव्हती का? याच राजकीय महिला नेत्या त्या कीर्तनकारांची बाजू घेत होत्या. त्याच वेळेला ही प्रवृत्ती ठेचून काढली असती तर आज ही वेळ आली नसती.

बंडातात्या कराडकरांच्या प्रकरणावरती तृप्ती देसाई म्हणाल्या; हा तर राजकीय महिलांचा दुटप्पीपणा
Bandatatya Karadkar : बंडातात्यांना RSS आणि भाजपचं पाठबळ नाही - अमृता फडणवीस

सुपरमार्केट मधील वाईन (Wine) विक्रीचा निर्णय आजपासून १५ दिवसांत मागे घेतला नाही तर हजारो महिला तारीख आणि वेळ न कळवता मंत्रालयात घेऊन आम्ही आंदोलन करणार, "करो या मरो" असे गांधीगिरी मार्गाने आंदोलन असेल, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याला जबाबदार शासन असेल असा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com