Ulhas Bapat Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या निर्णयाने ठाकरे गटावर काय परिणाम होणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले...

त्यांनी गंभीर चूक केलेली आहे असं माझं मत आहे, असं उल्हास बापट म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानंतर शिंदे गटाकडून मोठा जल्लोष करण्यात आला, तर ठाकरे गटाने याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अशात या सर्वांवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी देखील मत व्यक्त केलं आहे. (Latest Maharashtra Politics News)

निवडणूक आयोगाने हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी द्यायला नको होता. हा निर्णय दिल्यानंतर याचे काय राजकीय परिणाम होतील याची मॅच्युरिटी निवडणूक आयोगाकडे असणं आवश्यक होतं. सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर आपण निर्णय द्यावा हे इलेक्शन कमिशनला कळायला पाहिजे होतं, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणालेत.

'आज शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आहे, तर उद्या दुसरे सत्तेवर असतील तेव्हा तात्पुरता विचार न करता भारतीय लोकशाही सुदृढ कशी होईल या दृष्टीने विचार करायला हवा. लोकशाही व्यवस्थित कशा रीतीने चालेल याचा विचार आपण केला पाहिजे. तसेच या सगळ्यांचा गांभीर्याने विचार सर्व राजकीय पक्षांनी केला पाहिजे, असंही उल्हास बापट म्हणाले.

त्यांनी गंभीर चूक केलेली आहे...

'सुप्रीम कोर्टाचा निकाल जर आत्ताच्या इलेक्शन कमिशनच्या उलट लागला तर मग सगळी गंभीर परिस्थिती निर्माण होईल. इलेक्शन कमिशन काय निर्णय देतं याचा परिणाम सुप्रीम कोर्टावर होतं नाही. तेव्हा इलेक्शन कमिशनने हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधी दिल्यानं त्यांनी गंभीर चूक केलेली आहे असं माझं मत आहे, असं उल्हास बापट म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरे गट पुढे काय करणार यावर बोलताना उल्हास बापट म्हणाले की,'उद्धव ठाकरेंकडे फार मोठी टीम आहे. कपिल सिब्बल आणि मनू सिंघवी सारखे वकील आहेत. त्यांना दिलेल्या निर्णय विरोधात सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र वेतन नियम 2026 लागू, 8 तास काम दुप्पट ओव्हर टाईम

एजंटकडून कर्जवसुलीसाठी रुग्णालयातच छळ, बँक कर्मचाऱ्याची शेतकरी महिलेवर मुजोरी; पोलीस आणि वसुली एजंटचं साटंलोटं?

डिलिमिटेशनला पवार-स्टॅलिन अनुकूल? सशर्त अटींसह पाठिंबा देण्याचे संकेत

2035 पर्यंत इस्लाम जगातला सर्वात मोठा धर्म; भारतात 2070 मध्ये 33 कोटी मुस्लीम?

'ऑपरेशन टायगर'आधी भाजपचं 'ऑपरेशन लोटस'! शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोठं खिंडार

SCROLL FOR NEXT