महिला PSI च्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवालदाराला सात वर्षे कारावास
महिला PSI च्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवालदाराला सात वर्षे कारावास कैलास चौधरी
महाराष्ट्र

महिला PSI च्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवालदाराला सात वर्षे कारावास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) मनीषा गिरी यांना चार मजली इमारती वरून ढकलून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्याचे हवालदार तथा पोलीस गाडी चालक आशिष ढाकणे याला सात वर्ष कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

हे देखील पहा -

शहरातील उस्मानाबाद बीड रस्त्यालगत असलेल्या चार मजली इमारतीमध्ये मनीषा गिरी राहत होत्या. या इमारती वरून मनीषा गिरी खाली पडल्या असल्याचे निदर्शनास आले होते. हा प्रकार 15 मे 2019 रोजी सकाळी सहा वाजता घडला होता.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर आनंद नगर पोलिस ठाण्यातील हवालदार तथा चालक आशिष ढाकणे यानेच PSI मनीषा गिरी यांना ढकलून दिल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये न्यायालयाने गिरी यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ढाकणे याला सात वर्षे कारावास व 25 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

International Dance Day 2024: भारतातच नव्हे तर जगभरातही प्रसिद्ध आहेत हे शास्त्रीय नृत्य; जाणून घ्या

Uday Samant : छत्रपतींच्या गादीचा अपमान कोणी केला? बुधवारी कोल्हापुरात सगळं उघडं करणार : उदय सामंत

Sairat Movie: सुपरहिट सैराटला ८ वर्ष पूर्ण! आर्चीने शेअर केले कधीही न पाहिलेले खास फोटो

Sabudana Benefits: साबुदाणा आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा फायदे

Heat Wave Alert in Mumbai : नागरिकांनो सावधान! मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये येणार उष्णतेची लाट, आज आणि उद्या कसं असेल तापमान?

SCROLL FOR NEXT