मला संपवण्यासाठी महाविकासआघाडी कडून षडयंत्र : गोपीचंद पडळकर Saam Tv
महाराष्ट्र

मला संपवण्यासाठी महाविकासआघाडी कडून षडयंत्र : गोपीचंद पडळकर

महाविकासआघाडी विरोधात आवाज उठवल्याने आणि एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला संपवण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : महाविकासआघाडी विरोधात आवाज उठवल्याने आणि एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला संपवण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या षड्यंत्रामधून आटपाडी या ठिकाणी आपल्यावर वरीष्ठ पातळीपासून नियोजन करून, हल्ला करण्यात आल्याचे आरोप देखील महाविकास आघाडी सरकारवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते आटपाडीच्या झरे या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हे देखील पहा-

सांगलीच्या आटपाडी या ठिकाणी रविवारी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कार्यकर्त्यांच्या गटामध्ये जोरदार हाणामारीचे प्रकार घडला आहे. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी, तर दोन ते तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह दहा जणांच्या वर गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

वारंवार महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आपण आवाज उठवत आहोत आणि यातून आपल्याला रोखण्यासाठी संपवण्याच्या दृष्टीने षडयंत्र करून हा हल्ला करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात एसटी आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये उद्या 10 नोव्हेंबर दिवशी एसटीचा मोठे आंदोलन आपण पुकारले आहे. त्या आंदोलनाच्या ठिकाणी आपण जाऊ नये, म्हणून आटपाडी मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून नियोजन रित्या आपल्यावर हल्ला करण्यात आला आहे, असा आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT