हृदय पिळवटून टाकणारी घटना: पोटच्या चिमुकलीने डोळ्यादेखत तडफडून सोडला प्राण
हृदय पिळवटून टाकणारी घटना: पोटच्या चिमुकलीने डोळ्यादेखत तडफडून सोडला प्राण Saam Tv

हृदय पिळवटून टाकणारी घटना: पोटच्या चिमुकलीने डोळ्यादेखत तडफडून सोडला प्राण

सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट या तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली
Published on

अक्कलकोट : सोलापूर Solapur जिल्ह्यामधील अक्कलकोट या तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका ६ वर्षीय चिमुकलीचा वडिलांच्या डोळ्यासमोर दुर्दैवी अंत झाला आहे. दिवाळी सणाकरिता आजोबांच्या घरी आल्यावर चिमुकलीवर काळाने घाला घातला आहे. चिमुकलीला खाऊ आणि खेळणी आणतो, म्हणून आजोबा देवदर्शनाकरिता गेले असता, पाठिमागुन जीपच्या धडकेत नातीचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

ऐन दिवाळी सणाच्या दिवसात चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे. श्रेया विठ्ठल चलगेरी असे मृत पावलेल्या ६ वर्षीय मुलीचे नाव आहे. अक्कोलकोट तालुक्यातील संगोगी गावातील रहिवासी असणारे विठ्ठल चलगेरी आपल्या कुटुंबाबरोबर दिवाळी सणासाठी वागदरी याठिकाणी आपल्या सासऱ्यांकडे आले होते. जावई विठ्ठल चलगेरी हे ४ दिवस आपले सासरे मल्लिनाथ पोमाजी यांच्याकडेच राहणार होते.

यामुळे सासरे मल्लिनाथ यांनी आपल्या शेतातील सर्व जबाबदारी जावयावर सोपवून, मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या गावी यात्रेसाठी निघून गेले. यात्रेतून नातीला खेळणी आणि खाऊ आणतो, असे आश्वासन त्यांनी आपल्या नातीला दिले होते. सासऱ्यांनी शेतातील जबाबदारी सोपवल्यामुळे, ५ नोव्हेंबर दिवशी दुपारी जावई विठ्ठल आपल्या ६ वर्षीय लेकीला घेऊन शेतात गेले होते.

हृदय पिळवटून टाकणारी घटना: पोटच्या चिमुकलीने डोळ्यादेखत तडफडून सोडला प्राण
Sameer Wankhede: मेहुणीविरोधात ड्रग्ज केस? नवाब मलिकांचा नवा सवाल

शेतात गेल्यावर विठ्ठल यांनी आपल्या लेकीला सासूकडे सोडून रस्त्याच्या पलीकडे जनावरांना चारा- पाणी टाकण्याकरिता गेले होते. यावेळी ६ वर्षीय मुलगी वडिलांच्या मागे धावत येत होती. दरम्यान, रस्त्यावर सुसाट वेगाने येणाऱ्या जीपने ६ वर्षीय चिमुकलीला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातमध्ये विठ्ठल यांच्या डोळ्यासमोरच श्रेयाचा तडफडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जीपचालक प्रवीण रेवणसिद्धप्पा डोले याच्याविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com