Sameer Wankhede: मेहुणीविरोधात ड्रग्ज केस? नवाब मलिकांचा नवा सवाल

नवाब मलिक हे एकापाठोपाठ एक आरोप करताना दिसत आहे
Sameer Wankhede: मेहुणीविरोधात ड्रग्ज केस? नवाब मलिकांचा नवा सवाल
Sameer Wankhede: मेहुणीविरोधात ड्रग्ज केस? नवाब मलिकांचा नवा सवालSaam Tv
Published On

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी drug case देशाची राजधानी दिल्लीपासून मुंबईपर्यंत हालचाली मोठ्या वेगाने सुरू आहेत. या दरम्यानच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत Nawab Malik नवाब मलिक हे एकापाठोपाठ एक आरोप करताना दिसत आहे.

हे देखील पहा-

नवाब मलिक यांनी परत एकदा समीर वानखेडे यांच्यावर नवा आरोप केला आहे. मात्र, यावेळी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना त्यांच्या मेहुणी sister-in-law विषयी सवाल उपस्थित केला आहे. आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना ट्विट करून विचारले आहे की, तुमची मेहुणी देखील ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? नवाब मलिक यांनी नवा दावा केला आहे की, समीर वानखेडेंची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात ड्रग्जचा खटला सुरू आहे.

आता नवाब मलिक या मुद्द्यावर समीर वानखेडे यांच्याकडून सध्या उत्तर मागत आहेत. नवाब मलिक यांनी ट्विट करून समीर वानखेडे यांना सवाल केला आहे की, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. हा याचा पुरावा असल्याचे त्यांनी ट्विट नवाब मलिकांनी यावेळी केला आहे.

Sameer Wankhede: मेहुणीविरोधात ड्रग्ज केस? नवाब मलिकांचा नवा सवाल
5 वर्षांपूर्वीची नोटबंदी आठवतेय का? Digital Payments मध्ये वाढ, परंतु रोख व्यवहार वाढले

यावर क्रांती रेडकरच्या बहिणीवर जानेवारी २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला असेल. मी सप्टेंबर २००८ मध्ये IRS झालो आहे. २०१७ साली माझे क्रांतीशी लग्न झाले आहे. मग २००८ च्या प्रकरणाशी माझा काय संबंध? असे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com