5 वर्षांपूर्वीची नोटबंदी आठवतेय का? Digital Payments मध्ये वाढ, परंतु रोख व्यवहार वाढले

8 नोव्हेंबर 2016 दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली
5 वर्षांपूर्वीची नोटबंदी आठवतेय का? Digital Payments मध्ये वाढ, परंतु रोख व्यवहार वाढले
5 वर्षांपूर्वीची नोटबंदी आठवतेय का? Digital Payments मध्ये वाढ, परंतु रोख व्यवहार वाढले Saam Tv

8 नोव्हेंबर 2016 दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी नोटबंदीची घोषणा केलेली होती. यानंतर 500 रूपयांच्या आणि 1 हजार रूपयांच्या जुन्या नोटा चलनामधून बंद करण्यात आले होते. परंतु, आता नोटबंदीला 5 वर्ष पूर्ण झाली आहे, असे असले तरी सध्या आता देशात हळूहळू का होईना रोख रकमेचे व्यवहार देखील वाढू लागले आहेत. पण एक सकारात्मक विषय म्हणजे डिजिटल पेमेंट देखील अगोदरच्या तुलनेत वाढले आहे.

हे देखील पहा-

यावरून हळूहळू का होईना पण आपण कॅशलेस इकॉनॉमीकडे देखील जात असल्याचे दिसून येत आहे. मागील जवळपास 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा प्रमाणात फटका बसला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार मागील आर्थिक वर्षात कोरोना महासाथीमुळे लोकांनी रोख रकमेचा वापर जास्त प्रमाणात केला होता. परंतु, या दरम्यान, नेट बँकिंग, कार्ड आणि UPI द्वारे होणारे व्यवहार वाढले आहेत.

5 वर्षांपूर्वीची नोटबंदी आठवतेय का? Digital Payments मध्ये वाढ, परंतु रोख व्यवहार वाढले
Pune gang rape: 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

या सर्वात UPI मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये लोकप्रिय झाल्याचे दिसून आले होते. रिझर्व्ह बँकेच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार 4 नोव्हेंबर 2016 मध्ये 17.94 लाख कोटी रूपयांची रोख रक्कम चलनामध्ये होती. तर 29 ऑक्टोबर 2021 मध्ये त्यामध्ये वाढ होऊन ती 29.17 लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार मूल्य आणि प्रमाणानुसार आर्थिक वर्ष 2021-21 दरम्यान अनुक्रमे 16.8 टक्के आणि 7.2 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर 2019-20 दरम्यान 14.7 टक्के आणि 6.6 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com