baba ramdev and yashomati thakur
baba ramdev and yashomati thakur saam tv
महाराष्ट्र

Yashomati Thakur : 'भगवा परिधान करून...';रामदेव बाबांच्या 'त्या' वक्तव्यावर यशोमती ठाकूर भडकल्या

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Yashomati thakur News : बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. काँग्रेसच्या महिला नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील बाबा रामदेव यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'भगवा परिधान करून असं घाण बोलण्याची परवानगी कोणी दिलेली नाही. कोणताही धर्म हे मान्य करणार नाही, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी बाबा रामदेव यांच्यावर टीका केली. (Latest Marathi News)

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या, ज्यांना योगगुरु मानले जाते. तो माणूस भगवा परिधान करतो, तो इतक्या खालच्या दर्जाचं वक्तव्य करणं अशोभनीय आहे. देशात व राज्यात खूप विषय आहे. या सगळ्या गोष्टीवर पदडा टाकण्यासाठी व समाजाला देशाला विचलित करण्यासाठी हे वक्तव्य रामदेव बाबा करत आहे'.

'भगवा परिधान करून असं घाण बोलण्याची परवानगी कोणी दिलेली नाही. कोणताही धर्म हे मान्य करणार नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली. अमृता फडणवीस देखील तिथे होत्या, पण त्या देखील त्या ठिकाणी असंवेदनशील दिसून आल्या,असेही देखील ठाकूर म्हणाल्या.

नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव?

ठाण्यातील योगा कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK Vs SRH : ऋतराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Today's Marathi News Live: आदित्य ठाकरेंचा 30 एप्रिलला श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT