Ranjitsinh Naik Nimbalkar, Congress, Mahavikas Aaghadi saam tv
महाराष्ट्र

Maha Vikas Aghadi : 'काॅंग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल'

भाजप खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे एकेकाळी काॅंग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष हाेते.

भारत नागणे

Ranjitsinh Naik Nimbalkar News : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर काॅंग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. लवकरच काॅंग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील असा मोठा गौप्यस्फोट माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पंढरपूरात आज (शनिवार) पत्रकारांशी बोलताना केला. (Maharashtra News)

महाविकास आघाडी (mva) फुटल्या नंतर काॅंग्रेसचे आमदार भाजपमध्ये सहभागी होतील असा दावा ही खासदार निंबाळकर यांनी केला. काॅंग्रेस सध्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करीत असली तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेने सोबत जावून काॅंग्रेसचे नुकसान होईल अशी त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यामुळेच काॅंग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल असे खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्री अजित पवार यांनी मतदार संघातील विकास कामांसाठीच सर्व आमदारांना निधी दिला आहे. त्यातून कोणता आमदार स्वतःची कामे करत नाही. आमदार रोहित पवारांना आमदार निधी विषयाचा अभ्यास थोडा कमी असावा असा टोलाही खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT