vijay wadettivar saam tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: महंतांनी आपली मर्यादा राखावी, विजय वडेट्टीवार यांचा नामदेव शास्त्रींवर घणाघात

Vijay Wadettiwar Criticized Mahant Namdeo Shastri: निपक्ष चौकशी व्हावी अशी मागणी महंतांनी केली असती तर त्यांचं श्रेष्ठत्व दिसलं असतं असा एकप्रकारे उपदेशच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महंत नामदेव शास्त्रींना दिला.

Saam Tv

पराग डुबळे, साम टीव्ही

नागपूर : गुन्हेगाराला जात,धर्म,पंत काही नसतं,बीड प्रकरणाला मराठा विरुद्ध वंजारी,ओबीसी असा जातीय रंग दिला जातोय, कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामा नये ,जो कोणी आरोपी असेल त्याची सरकारने चौकशी करावी.निपक्ष चौकशी व्हावी अशी मागणी महंतांनी केली असते तर त्यांचं श्रेष्ठत्व दिसलं असतं असा एकप्रकारे उपदेशच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महंत नामदेव शास्त्रींना दिला.अमुक आमच्या समाजाच्या तमुक तुमच्या सामाज्याचा यांच्या बाजूने हे बोलणार त्यांच्या बाजूने ते बोलणार म्हणजे काय महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अड्डा करून बिहार करायचा असा आहे का ?

गुन्हेगारांचे समाज त्यांना पाठीशी घालायला लागले तर राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहणार नाही,शासन म्हणून सरकारला आपली जबाबदारी कळायला हवी.प्रत्येक प्रकरणामध्ये जरांगे पाटील यांनी कुदायाची गरज नाही,पण प्रत्येक ठिकाणी ते येतात.सुरेश धस जरा बॅलेन्स च असतात परंतु एखाद्या घटनेला समाजावर नेणे योग्य नाही.देशमुख कुटुंबीय असो किंवा वाल्मिकचे पाठीराखे असो दोघांनीही असं करणे उचित नाही.

ज्या पद्धतीने संतोष देशमुखचा खूण केला त्या घटनेचं समर्थन करणारा माणूस हा नालायक असतो,तो जगण्याच्या लायक नाही.बीड जिल्हयात ही घटना घडल्यावर धनंजय मुंडेंनी त्यावेळेसच मंत्र्यांना भेटून कारवाईची मागणी करायला पाहिजे होती.त्यावेळी यांची तोंड बंद होती आणि या सगळ्या ठिकाणी बीडचं उदाहरण दिलं जातं,पूर्वी बिहार म्हणायचे आता बीड म्हणतात.डीपीसीच्या बैठकीत सुधीर मनगंटीवार आपल्या जिल्ह्याला बीड करायचा नाही असं म्हणाले होते.यावरूनच भाजपच्या नेत्यांना बीड प्रकरणावरून भय निर्माण झाले आहे.अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सकाळी माध्यमांसोबत बोलतांना केली.

नितेश राणेंनी घटना वाचलेली नसावी- विजय वडेट्टीवार'

लवकरच राज्यामध्ये धर्मांतर कायदा आणू असे वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केले होते त्यावर विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

नितेश राणेंनी घटना वाचलेली नाही. घटनेवर राणेंचा विश्वास असेल, तर त्यांचे असे वक्तव्य आले नसते.त्यांना देश मनुस्मृतीच्या भरवशावर चालवायचा आहे की राज्यघटनेप्रमाणे चालवायचा आहे? दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होत असेल तर हा संविधानाचा आणि मंत्रिपदाचा अपमान असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणू,या भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार बोलत होते.तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली.

राज्यात ८० हजार कंत्राटदारांचे बील थकीत

राज्यातील अनेक विभागातील कंत्राटदारांकडून सरकारला तिसऱ्यांदा इशारा देण्यात आला आहे.पीडब्ल्यूडी इरिगेशन,सामाजिक न्याय आदिवासी विकास विभागाच्या कंत्राटदारांचेही पैसे मोठ्या प्रमाणात थकीत आहे. कुणालाच पैसे मिळत नाही.सगळ्या खात्यांमध्ये बोंबाबोंब आहे.अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शेतकऱ्यांचा अहवाल सहा महिन्यापासून प्रलंबित आहे, पैसे मिळालेले नाही. शेतकरी, अंगणवाडी सेविका, जलजीवन मिशन, निराधार योजना, रोजगार हमी योजना कुठेही पैसे मिळत नाही. नुसता बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात,अन् याच्यासाठी हे सरकार,अशी परिस्थिती आहे.सरकार अजूनही स्थिर झाल्याचे लक्षण नाही.ही अस्थिरता हिस्से वाटणी वरून आहे.प्रचंड बहुमत मिळूनही असे अस्थिर सरकार महाराष्ट्राने बघितलेलं नाही.अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यात शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. जवळपास 89 कोटी रुपयांची थकबाकी थकीत असल्याने कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. या प्रकरणी बोलताना विजय वडेट्टीवारांनी सरकारवर ताशेरे ओढले.

या सगळ्यांना काळी जादू,पांढरी जादू याची माहिती असावी.

हे सगळेच काळे जादूवाले असतील, म्हणून यांना एकमेकांचे गुपित माहित असेल. रामदास कदम, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे हे सर्व शिवसेनेचे मोठे नेते राहिले आहे.असा टोला विजय वडेट्टीवार यांनी काळा जादू प्रकरणावरून लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT