Leaders of Congress and Vanchit Bahujan Aghadi during the joint press conference announcing their alliance for the Mumbai civic elections. Saam Tv
महाराष्ट्र

अखेर काँग्रेस-वंचितच्या आघाडीची घोषणा, काँग्रेसच्या हाताला वंचितची साथ

Congress Vanchit Alliance: मुंबई महापालिकेत काँग्रेसला नवा भिडू मिळालाय... वंचित आणि काँग्रेसच्या युतीमध्ये वंचितला किती जागा मिळाल्या आहेत ? काँग्रेस किती जागांवर लढणार आहे... ? या युतीमुळे कुणाचं समीकरण बिघडणार आहे?

Bharat Mohalkar

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीने मुंबई महापालिकेसाठी संयुक्त पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली... याच पत्रकार परिषदेत वंचितने आपल्याला मिळालेल्या जागांचा आकडाही जाहीर केलाय....

खरंतर 1998 मध्ये काँग्रेसच्या पाठींब्यावर भारिप बहुजन महासंघ पक्षातून प्रकाश आंबेडकर खासदार झाले...मात्र पुढे ही युती तुटली आणि काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर वेगवेगळे झाले... त्यानंतर अनेकदा काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची चर्चा झाली.. लोकसभा निवडणुकीत तर दोन्ही पक्षांनी जागा वाटपाची चर्चाही केली होती... मात्र जागा वाटपांवरुन ही चर्चा फिस्कटली आणि वंचितने स्वबळाचा नारा दिला... आता नगरपालिका निवडणुकीतील आघाडीनंतर महापालिकांसाठीही दोन्ही पक्ष एकत्र आलेत... मात्र वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीमुळे कसे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे?

मुंबईत काँग्रेसची 18-20 टक्क्यांची व्होटबँक

वंचित बहुजन आघाडीचीही 3 टक्के मत

धारावी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, मुलुंडसह उपनगरातही वंचितचा प्रभाव

काँग्रेस आणि वंचितमुळे ठाकरेंना 20 जागांवर फटका बसण्याची शक्यता

वंचितला 62 जागा मिळाल्या असल्या तरी 2-3 जागांवर तिढा कायम आहे...त्यामुळे दोन्ही पक्षातला तिढा सुटणार की पुन्हा लोकसभेप्रमाणेच जागा वाटपावरुन आघाडी तुटणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.. मात्र काँग्रेस आणि वंचितची आघाडीकडे धर्मनिरपेक्ष मतं वळाल्यास ठाकरेसेनेसोबतच भाजपलाही फटका बसण्याची शक्यता अधिक आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT