ऐकलंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात स्वबळाचा नारा दिलाय.. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय..मात्र यामागे खरं कारण आहे ते म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीत लढवल्याने अनेक मतदारसंघातून पंजा गायब झाला होता आणि तीच भीती पालिका निवडणुकांमध्ये आहे. त्यामुळे आता युती, आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे संकेत हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेत...
दुसरीकडे ठाकरे सेनेने सपकाळ यांच्या भूमिकेवरुन खोचक टोला लगावलाय. खरंतर 2014 आणि त्यापाठोपाठ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दोन अंकी संख्याही गाठू न शकलेला काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलाय...
लोकसभेला काँग्रेसला तब्बल 14 आणि अपक्ष विशाल पाटलांच्या पाठींब्यामुळे 15 जागा मिळाल्या... तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 101 जागा लढवूनही अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आलाय.. तर ठाकरेंच्या शिवसेनेला 20 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या.. त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेसचा पंजा गायब झालाय.
आता ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे.. त्यातच राज ठाकरे हे कट्टर हिंदूत्ववादी आणि मराठी अस्मितेसाठी चर्चेत आहेत.. त्यामुळे ठाकरेंसोबत युती केल्यास मुस्लीम आणि उत्तर भारतीय मतं दुरावण्याची शक्यता असल्याने आता काँग्रेसनं सावध भूमिका घेतलीय..मात्र त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांचं टेन्शन वाढलंय.. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसची समजूत घालून पुन्हा महाविकास आघाडी एकत्रित लढणार की सर्वच पक्ष स्वतंत्र लढून नशीब आजमावणार? यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.