Congress leader Tanvi Kamlekar celebrates victory after being elected chairperson of Miraj Panchayat Samiti in Sangli district. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसने केला भाजपचा गेम, बालेकिल्ल्यातच भाजपला दिला शह

Political Twist In Sangli: नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला... मात्र काँग्रेसने गनिमी कावा करत भाजपला मोठा धक्का दिलाय..कुठं झाली आहे विरोधकांची एकजूट ? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच... जयंत पाटलांच्या याच वक्तव्याप्रमाणे आता काँग्रेसनं सांगलीच्या मिरजेत भाजपला मोठा धक्का दिलाय... भाजपचा बालेकिल्ला असेलल्या मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने गनिमी कावा केला.... आणि भाजपविरोधात सर्व पक्षांच्या एकजुटीमुळे भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेत सुरेश खाडेंना मोठा धक्का दिला.... आणि काँग्रेसच्या तन्वी कमलेकर विजयी झाल्या....

खरं तर भाजपचे गोपिचंद पडळकर, मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडेंनी सांगलीत मोठा जोर लावला होता.. मात्र सांगलीतील 10 पैकी भाजपला केवळ जत पंचायत समितीवर वर्चस्व मिळवलंय..तर मिरज, पलुस आणि कडेगाव या पंचायत समितीत काँग्रेसचे सभापती निवडून आले आहेत... खानापूर आणि आटपाडीचे सभापतीपद हे शिंदेसेनेनं पटकावलंय.. वाळवा आणि कवठेमहांकाळचं सभापतीपद पवारांच्या राष्ट्रवादीनं तर तासगाव आणि शिराळ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं सभापतीपद पटकावलंय..

खरं तर मिरज पंचायत समितीत 22 पैकी 10 जागा भाजपनं जिंकल्या होत्या... त्यामुळे भाजपने सभापतीपदासाठी जुळवाजुळव सुरु केली.. मात्र काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र आली आणि थेट भाजपला शह दिलाय... त्यावरुन भाजपनंही आक्रमक प्रतिक्रिया दिलीय...

नगरपालिका, महापालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला... मात्र त्यानंतरही भिवंडी महापालिकेत काँग्रेसनं डाव टाकला आणि भाजपची महापौरपदाची संधी गेली...आता सर्व सत्ताधारी आणि विरोधकांची भाजपविरोधात मोट बांधून काँग्रेसनं सांगलीतही भाजपला शह दिलाय.... त्यामुळे भाजप आता नेमकी काय रणनीती आखणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

Crime: अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूचा कारनामा, फार्म हाऊसवर बोलावलं, भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार

Maharashtra Live News Update: हार्बर मार्गावरील नेरूळ जुईनगर स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; पत्रात गर्भलिंगनिदान प्रकरणात रुपाली चाकणककरांचे नाव, खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

SCROLL FOR NEXT