Sanjay Raut News Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर भाजपच्या गुंडांनीच हल्ला केला; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut vs BJP: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजपच्या गुंडांनीच हल्ला केला, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेतून केला.

Satish Daud

Sanjay Raut criticizes BJP

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी १५ जानेवारीला मणिपूर येथून भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. या यात्रेला भारत जोडो न्याय यात्रा असे नाव देण्यात आले आहे. काल म्हणजेच रविवारी (२१ जानेवारी) यात्रेचा आसाम राज्यात प्रवेश झाला. यावेळी अज्ञात लोकांनी काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या वाहनावर हल्ला चढवला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यांच्या नागांव जिल्ह्यातील रॅलीला संबोधत करण्यापूर्वी ही घटना घडली. दरम्यान, हा हल्ला भाजपच्या गुंडांनीच केला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेतून केला.

संजय राऊत (Sanjay Raut News) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याबाबत सखोल माहिती दिली. त्याचबरोबर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून भाजपवर जोरदार टीका देखील केली. (Latest Marathi News)

अयोध्येच्या कार्यक्रमातून भाजपने २०२४ च्या प्रचाराची सुरुवात केली आहे. इव्हेंट करण्यात भाजपचा हात कुणीही धरू शकत नाही. आम्ही सांगू तेच कार्यक्रमाला येतील, सांगू तसंच कार्यक्रम होईल, असा भाजपचा अजेंडा असल्याची टीका राऊतांनी केली.

राम सर्वांचे आहेत, ते जेवढे अयोध्येत आहेत. तेवढेच पंचवटीत सुद्धा आहे. म्हणूनच आम्ही आज दर्शनासाठी पंचवटीला जातोय. लवकरच आम्ही अयोध्येत देखील जाऊ, एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा त्यांना आम्हीच अयोध्येत घेऊन गेलो होतो. ते आता भाजपत आहेत, त्यांना भाजपचे आदेश पाळावे लागतील, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान, भारत जोडो यात्रेतील खासदार जयराम रमेश यांच्या वाहनांवर रविवारी अज्ञातांनी हल्ला केला होता. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या गुंडांनीच हा हल्ला केला असून ही हुकूमशाही आहे. भाजपशासित राज्यात हा हल्ला झाला असून शिवसेना या हल्ल्याचा निषेध करते, असा घणाघात राऊतांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fat Girls Fashion: बॉडीकॉन सारख्या ड्रेसमध्ये जाड दिसता? मग, तुमच्यासाठी हे ड्रेस टाईप आहेत परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

Maharashtra Politics : पुण्यानंतर आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय हालचाली वाढल्या

Maharashtra Live News Update : नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

कंठ दाटला, डोळ्यात पाणी; नाशिकच्या राड्यानंतर फरांदे स्पष्टच बोलल्या, थेट भाजपची चूक सांगितली

Pushkar Jog: 'माझं घर गेलं...'; मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला लागली भीषण आग, थोडक्यात वाचला जीव

SCROLL FOR NEXT