Ajit Pawar Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलंय; बड्या नेत्याचा दावा, CM शिंदेंचं काय होणार?

Prithviraj Chavan on Ajit Pawar Oath: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Prithviraj Chavan on Ajit Pawar Oath: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातून बंड करत भाजपची कास धरली. रविवारी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी विधानभवनावर दाखल होत मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.

दरम्यान, भाजपने अजित पवार (Ajit Pawar) यांना सरकारमध्ये घेऊन एकनाथ शिंदे यांना पर्याय शोधला असल्याचं बोललं जातं आहे. यावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

अजित पवार हे भाजपसोबत जाणार हे माहित होतं, अनेक दिवसांपासून त्यांच्यात मंत्रिपदाची बोलणी सुरू होती. आता सुद्धा अजित पवार यांना भाजपने मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण हे आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या स्वागतासाठी साताऱ्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलटसूलट चर्चांना उधाण आलं.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

"राज्याच्या राजकारणात जे काही झालं, ते आपण सर्वांनीच पाहिलं आहे. आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी साताऱ्यात येणार आहे. महाविकासआघाडीचा घटक म्हणून त्यांना समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी मी इथे उभा आहे. काही माणसं गेली, तरी महाविकासआघाडीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही", असं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

'अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन'

"अजित पवार यांच्या भूमिकेवर मी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे बोललो होतो. पण त्यामुळे मी अडचणीत आलो, अजित पवार असा निर्णय घेणार हे माहिती होतं. इतक्या दिवसांपासून भाजप आणि त्यांच्यात मंत्रीपदाबाबत वाटाघाटी सुरू होत्या".

"आताही भाजपने अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलेला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना बाजूला करून किंवा अध्यक्षांकडून त्यांना अपात्र करून ते आपोआप बाजूला गेले की अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल", असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

Onion Juice: जाड अन् घनदाट केस हवीयेत? लावा कांद्याचा रस, काही दिवसातच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT