chandrakant khaire, nana patole saam tv
महाराष्ट्र

Congress vs Khaire: खैरेंचे 'ते' वक्तव्य काँग्रेसच्या जिव्हारी; नेत्यांचा ठाकरे गटाला चिमटा (पाहा व्हिडिओ)

राज्यपालांनी आमच्या विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या यादीवर शेवटपर्यंत सही केली नाही असा टाेला खैरेंनी मारला.

साम न्यूज नेटवर्क

Congress vs Chandrakant Khaire : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील साेळा आमदार (शिंदे यांच्यासह) सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यास भाजपचा प्लॅन बी तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत, त्यांनी 22 काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी तयार केले आहे. या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) संतापले. ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतर पक्षांबद्दल काहीही बोलू नये, असेही नाना यांनी खैरेंना सुनावलं. (Nana Patole Latest Marathi News)

नाना पटाेले यांच्या आक्रमक भुमिकेनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील (satej patil) यांनीही चंद्रकांत खैरे यांनी देखील खैरेंवर ताेफ डागली. पाटील यांनी खैरे हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी असे वक्तव्य का केले, याचा खुलासा करून माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या नांदेड दौऱ्यात अनेक लोक आणि छोटे-मोठे नेते आमच्या संपर्कात आहेत. ते मोठे नेते इथलेच (नांदेडचे अशोक चव्हाण) नाहीत तर इतर ठिकाणचेही आहेत असे म्हटले हाेते. राष्ट्रवादीसह इतर विविध पक्ष आहेत. कारण त्या नेत्यांनाही आपले भविष्य अंधकारमय दिसत आहे. शिवसेनेचे घ्या. सदस्य गेले, पक्षाचे नाव गेले, निवडणूक चिन्ह गेले. आता त्या पक्षात काय उरले ? असे म्हटले हाेते. (Maharashtra News)

दरम्यान चंद्रकांत खैरे यांनी, 'शिंदे गटातील साेळा आमदारांना न्यायालयाने अपात्र ठरवल्यास फडणवीस यांचा प्लॅन बी असल्याचे म्हटलं. त्यांनी काँग्रेसचे बावीस आमदार तयार केले आहेत. ते सर्व भाजपमध्ये (bjp) प्रवेश करतील आणि फडणवीस मुख्यमंत्री होतील असा दावा खैरेंनी केला. आपण मुख्यमंत्री झालो नाही याची खंत त्यांना आहे. त्याचा चेहराच सांगताे. ते बेटिंगमध्ये गुंतलेले आहेत. या बावीस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होईल असेही खैरेंनी नमूद केले.

भविष्यात महाराष्ट्रात काय होणार आहे याची ब्ल्यू प्रिंटही फडणवीस यांनी काढली आणि केव्हाही निवडणुका होऊ शकतात असे खैरेंनी म्हटले. ते म्हणाले, 'निवडणूक कधीही होऊ शकते, तयार राहा. राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. राष्ट्रपती राजवट का लागू केली जाऊ शकते हे सर्वांनाच माहीत आहे. राज्यपाल कोणाचेही काम करत नाहीत. आमच्या विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या यादीवर शेवटपर्यंत सही केली नाही असा टाेला देखील खैरेंनी मारला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT