Party Worker Wash Nana Patole Feet saam tv
महाराष्ट्र

Nana Patole: कार्यकर्त्यानं धुतले नानांचे पाय; नानांच्या सरंजामी वृत्तीवर टीकेची झोड

Party Worker Wash Nana Patole Feet : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मोठ्या वादात सापडले आहेत. अकोला दौ-यात नाना पटोले यांनी आपले चिखलानं माखलेले पाय चक्क आपल्या कार्यकर्त्याकडून धुऊन घेतले. त्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय. नेमका काय प्रकार झाला आणि नानांनी काय केलं त्यावरचा हा रिपोर्ट.

Tanmay Tillu

नाना पटोले अकोल्यातील वाडेगावात एका कार्यक्रमासाठी आले होते.. यावेळी पावसामुळे झालेल्या चिखलातून ते चालत निघाले होते...त्यानंतर गाडीत बसताना कार्यकर्त्यांनं नानांचे पाय धुतले. त्यामुळे काँग्रेसच्या आणि नाना पटोलेंच्या सरंजामी वृत्तीवर टीका होतेय.

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

नानांची राजकीय कारकीर्द आक्रमक, बहुआयामी ओबीसी नेते अशीच आजवर पाहायला मिळाली. नाना पटोलेंनी राजकारणातली आमदारकी,खासदारकी तर उपभोगलीच त्यासह विधानसभेचं अध्यक्षपदही त्यांना मिळालं.मात्र त्यानंतर मविआनं बरचं काही भोगलं. याचा अर्थ नाना तुम्ही राजकारणात नवखे नाहीत. मग अकोल्यातल्या दौ-यात एका कार्यकर्त्याकडून पाय धुऊन घेताना तुमच्या मनात आपण काही चुकीचं करत असल्याची भावना कशी डोकावली नाही? आता या सरंजामी प्रकारानंतर सत्ताधाऱ्यांनी पटोलेंना चांगलंच धारेवर धरलंय.

नानांनी आता सारवा सारव केली असली तरी पुरोगामी विचारांच्या बाता करणा-या पक्षातल्या प्रदेशाध्यक्षाला असला प्रकार नक्कीच शोभत नाही. कार्यकर्त्यांचं नेत्यांवर अंधभक्ताप्रमाणे प्रेम असतं. ते आपल्या नेत्यासाठी काहीही करू शकतात. म्हणून नानांनी आपल्या कार्यकर्त्याला असं करू देणं कितपत योग्य आहे? म्हणूनच नाना ही कोणती संस्कृती? असा सवाल उपस्थित होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भुसावळ रेल्वे स्टेशन जवळ कारला अचानक आग, वाहन जळून खाक

बाईकची मागची सीट उंच का असते? तुम्हाला महितीये का उत्तर?

Mumbai-Pune Expressway: नव्या वर्षात मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुसाट, एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक कधी सुरू होणार? तारीख आली समोर

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौरांकडून पक्षाचा राजीनामा

Nath Designs: नथीचा नखरा! लग्न समारंभासाठी शानदार लूक हवा? पाहा नथीचे डिझाइन

SCROLL FOR NEXT