मढेघाट ट्रेकदरम्यान आग्या मोहोळाच्या मधमाशांचा हल्ला
१४-१७ वयोगटातील ३५ ट्रेकर्स जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
स्थानिकांच्या मदतीने वेळीच रेस्क्यू, मोठा अनर्थ टळला
यापूर्वीही या परिसरात मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना
पुण्यात गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणांवर आग्या मोहोळांच्या मधमाशांनी हल्ला केला.पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या, केळद ग्रामपंचायत (ता.राजगड) हद्दीत मढेघाट परिसरात पुण्यातील एका साहसी ट्रेकिंगचे क्लासकडून आयोजित करण्यात आलेल्या ट्रेकिंग दरम्यान ही घटना घडली. या हल्ल्यात ३५ तरुण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये ट्रेकर प्रशिक्षकांचा सुद्धा सहभाग आहे. बहुतांशी विद्यार्थी हे १४ ते १७ वयोगटातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना रविवार सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार मढेघाट परिसरात पुण्यातील साहसी ट्रेकिंग करणाऱ्या एका क्लासच्या माध्यमातून ट्रेक आयोजित करण्यात आला होता. या ट्रेकला सुमारे पन्नासहून अधिक विद्यार्थी आणि प्रशिक्षक तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा समावेश होता.मढेघाट ते उपंडा असा ट्रेक करत असताना, मढे घाट उतरल्यानंतर मध्यभागी गेल्यावर गर्द झाडीमध्ये झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या माशा उठल्याने विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला.
मोठ्या प्रमाणात मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने विद्यार्थी सैरभर झाले. यामध्ये आठ ते दहा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले, तर इतर २५ विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावा घेतला. दरम्यान ट्रेक मध्ये असलेल्या एक जणांनी तोरण माची हॉटेलचे मालक अभिजीत भेके यांच्याशी संपर्क साधला. यानंतर भेके, आणि या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी असलेले सूर्यकांत शिंदे यांनी परिसरातील असलेल्या सोशल मीडियाच्या व्हाट्सअप ग्रुप वर सदर घटनेची माहिती पाठवली.
घटनेची गांभीर्य ओळखून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत. कड्यामध्ये असलेल्या मुलांना वरती काढले दरम्यान परिसरातील वाहन चालक दीपक भुरक, मोहन खुळे ,महेश गुजर,यांनी स्वतःच्या वाहनांमधून व १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहितीतून या विद्यार्थ्यांना व प्रशिक्षकांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.
विद्यार्थ्यांना मळमळने, उलटी होणे, चक्कर येणे,तसेच चेहऱ्यावर ,डोळ्यावर, ओठावर सूज येणे आणि आणि दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना अशी लक्षणे होती. या रुग्णांवर वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले. यानंतर अधिक जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना पुणे येथील खाजगी रुग्णात उपचारासाठी पाठवण्यात आले. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली. दरम्यान मधमाशांनी हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रकार नसून या आधी देखील अनेक पर्यटकांवर अशा प्रकारे हल्ला करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.