मनपा अधिकाऱ्यांना डांबल्या प्रकरणी; काँग्रेसच्या 'त्या' फरार विरोधी पक्षनेत्याला अटक अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

मनपा अधिकाऱ्यांना डांबल्या प्रकरणी; काँग्रेसच्या 'त्या' फरार विरोधी पक्षनेत्याला अटक

महापालिकेतील अधिकाऱ्यांना कक्षामध्ये डांबून ठेवून त्यांच्याशी असभ्य वर्तणूक करण्याचा प्रकार महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याच्या चांगलाच अंगलट आलाय. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी विरोधी पक्षनेत्यासह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना स्वराज्य भवन येथून आज अटक केली आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : प्रभाग रचनेवर आक्षेप घेत अकोला महापालिकेतील (Akola Municipal Corporation) अधिकाऱ्यांना कक्षामध्ये डांबून ठेवून त्यांच्याशी असभ्य वर्तणूक करण्याचा प्रकार महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याच्या चांगलाच अंगलट आलाय. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी विरोधी पक्षनेत्यासह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना स्वराज्य भवन येथून आज अटक केली. काँग्रेसचे (Congress) मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी स्वराज्य भावनाच्या एका खोलीमध्ये स्वतःला व इतर पदाधिकाऱ्यांना बंद करून घेतले. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिस जवळपास दोन ते अडीच तास त्या खोलीबाहेर चकरा मारत होते. शेवटी पोलिसांनी साजिद खान पठाण यांना ताब्यात घेतले.

महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण (Sajid Khan Pathan) नगरसेवक मोहम्मद इरफान व इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे सहाय्यक नगररचनाकार व उत्तर झोन अधिकारी यांना मनपाच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या कक्षामध्ये आठ दिवस आधी जवळपास तीन तास डांबून ठेवून त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये भाजपला फायदा होईल, अशा पद्धतीने ही प्रभाग रचना करण्यात आला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी या मनपाच्या दोन्ही अधिकाऱ्यांवर लावला होता.

त्यावर त्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना मनपामध्ये जाब विचारला होता. मनपा आयुक्त कविता दिवेदी यांनी येऊन पोलिसांच्या मदतीने या दोघांना सोडविले होते. या घटनेनंतर मनपा उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी या संदर्भामध्ये सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी 15 विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

हे देखील पहा -

या घटनेनंतर काँग्रेसचे मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक मोहम्मद इरफान व इतर पदाधिकारी हे तेव्हापासून फरार होते. दरम्यान, भाजप कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार होते. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक मोहम्मद इरफान व इतर पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी स्वराज्य भवन येथे येऊन त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, साजिद खान पठाण यांनी स्वराज्य भवन येथील एक कक्ष बंद करून पोलिसांना बाहेर ताटकळत ठेवले. जवळपास दोन ते अडीच तास पठाण यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, ते दरवाजा उघडत नव्हते. शेवटी कालांतराने पोलिसांनी साजिद खान पठाण, नगरसेवक मोहम्मद इरफान व इतर पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. स्वराज्य भवनात त्यांना अटक करण्यात आली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 vs The Bengal Files : टायगर श्रॉफ की पल्लवी जोशी वीकेंडला कोणी मारली बाजी? 'बागी ४'नं शनिवारी कमावले 'इतके' कोटी

Small Business Tips: Small Business सुरू करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी बनवा

Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनाला गेलेले तीन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला तर दोघे बेपत्ता

SCROLL FOR NEXT