Maharashtra Lok Sabha Byelection : Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Byelection : काँग्रेसचा राज्यातील पहिला उमेदवार ठरला

Vishal Gangurde

नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. काँग्रेसने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर केला आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या सुपुत्राला उमेदवारी जाहीर केला आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करत रणशिंग फुटलं आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती कोणाला उमेदवारी देणार, हे पाहावे लागेल.

रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर

नांदेड लोकसभा पोटनिवणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं होतं. या लोकसभा मतदासंघात रवींद्र चव्हाण यांच नाव निश्चित झालं. त्यानंतर आज काँग्रेसने अधिकृत जाहीर केलं. नाना पटोले यांनी बुधवारी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं होतं. पटोले यांनी नांदेडमधून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली.

दिल्लीत किती जागांवर चर्चा झाली?

दिल्लीत बुधवारी काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील ८४ जागांवर चर्चा झाली. या बैठकीत ६२ जागांवर एकमत झालं. याच बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्याच मुलाला तिकीट जाणार असल्याचं निश्चित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज गुरुवारी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली.

काँग्रेसची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने बैठकांचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील जागावाटपासंदर्भात बैठका सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीत २१६ जागांचे जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस २० तारखेला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varun Sardesai : वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीवरून मविआत ठिणगी? वांद्रे पूर्वसाठी ठाकरेंच्या विश्वासूंना उमेदवारी घोषित, VIDEO

Kolhapur Politics: चंदगडच्या उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपचा दावा

Maharashtra News Live Updates : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

Meeting Inside Story : उद्धव ठाकरे अनुपस्थित, आदेश निघाला; मातोश्रीवरच्या आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय, नक्की काय घडलं?

Sameer Wankhede: समीर वानखेडे निवडणुकीच्या मैदानात? वानखेडेंची राजकारणात एन्ट्री?

SCROLL FOR NEXT