Rahul Gandhi  Saam Tv
महाराष्ट्र

राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांच्या अध्यक्ष पदाचा प्रस्ताव मांडला होता, या प्रस्तावाला प्रतिनिधींनी एकमताने मंजुरी दिली.

साम वृत्तसंथा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या (Congress) अध्यक्ष पदाच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, एआयसीसी प्रतिनिधी निवडीचे अधिकार काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षांना देण्याचा प्रस्तावासह सर्व लोकप्रतिनिधींनी एकमताने मंजूर केलेला हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला.

विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव मांडला होता, या प्रस्तावाला सर्व प्रादेशिक लोकप्रतिनिधींनी एकमताने मंजुरी दिली. आज १९ सप्टेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित राज्य प्रतिनिधींची बैठक झाली.

या बैठकीला राज्य निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.

तामिळनाडू काँग्रेस कमिटीने मांडला प्रस्ताव

तामिळनाडू काँग्रेस कमिटीने सोमवारी एकमताने एक ठराव मंजूर करून राहुल गांधींना पक्षाचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. TNCC अध्यक्ष के.एस. अलागिरी यांनी पक्षाच्या राज्य युनिट जनरल कौन्सिलच्या बैठकीत एक ठराव मांडला आणि राहुल गांधींना (Rahul Gandhi) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

"TNCC अध्यक्ष केएस अलागिरी यांनी मांडलेल्या ठरावात AICC अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि हा ठराव TNCC च्या जनरल कौन्सिलने एकमताने मंजूर केला होता." अशी माहिती TNCC ने ट्विट करुन दिली आहे. याअगोदर गुजरात, छत्तीसगडसह अनेक राज्य काँग्रेस समित्या आणि राजस्थानने राहुल गांधींना नेतृत्व करण्यासाठी आग्रह करणारे ठराव पारित केले आहेत.

राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं ही गुजरात काँग्रेसची इच्छा

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी इच्छुक नसल्याचे मध्यंतरी वृत्त होते. मात्र, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्षाचे अध्यक्ष व्हावे, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. गुजरात काँग्रेसनंही रविवारी पक्षनेतृत्वाकडे मागणी केली होती.

दुसरीकडे राजस्थान आणि छत्तीसगडमधूनही ठराव मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. गुजरातमध्ये प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ही मागणी केली आहे. उपस्थित सर्व सदस्यांनी राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत या ठरावाला मंजुरी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

SCROLL FOR NEXT