कोरोनाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एका मुलाखतीमध्ये कोविड संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
U.S. president Joe biden
U.S. president Joe bidenSaam Tv

वाशिंग्टन: गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनाने (Covid) हाहाकार माजवला आहे. अनेक देशांना लॉकडाऊन लागू करावा लागला होता. आता कोविड १९ संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. आता अमेरिकेतून कोविड-19 महामारी संपली आहे, असं बायडेन यांनी जाहीर केले आहे. त्यांनी रविवारी एका टीव्ही मुलाखतीत ही माहिती दिली.

जो बायडन म्हणाले की, अमेरिकेतील कोरोना महामारी संपली आहे. पण तरीही आम्ही यावर खूप काम करत आहोत. जो बायडन हॉलमध्ये बोट दाखवत म्हणाले की, येथे कोणीही मास्क घातलेला नाही. त्यामुळे मला वाटते की हे बदलत आहे. देशातील कोविड महामारीचा प्रभावीपणे अंत झाला आहे.

U.S. president Joe biden
रिक्षावाल्याचं नशीब पालटलं! शनिवारी लॉटरी खरेदी केली, रविवारी जिंकले २५ कोटी रुपये

जागतिक पातळीवरील एखाद्या मोठ्या नेत्याने कोविड-19 (Covid) साथीच्या आजाराबाबत असे वक्तव्य सार्वजनिकपणे करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 'आम्ही अजूनही कोरोना व्हायरसवर काम करत आहोत आणि अजूनही ही समस्या आहे. पण आपल्या देशात कोरोना संपलेला आहे, असंही बायडन म्हणाले.

अमेरिकेत प्रशासनाने काही आठवड्यांपूर्वी कोविड-19 च्या भविष्यातील लाटा टाळण्यासाठी चाचणी आणि लस कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सचा निधी मागितला होता. अमेरिकेसोबतच इतर देशांनीही कोविड-19 (Covid) महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर लादलेले प्रवासी निर्बंध रद्द केले आहेत, या पार्श्वभूमिवर बायडन यांनी हे विधाण केले आहे.

U.S. president Joe biden
क्रेडिट, डेबिट कार्डधारकांनो लक्ष द्या! १ ऑक्टोबरपासून नियम बदलणार, ग्राहकांवर होणार परिणाम

अमेरिकन सैन्याने तैवानचे रक्षण केले

चीन आणि तैवान तणावा दरम्यान, अमेरिकेने तैवानचे रक्षण केले, असा दावा अध्यक्ष जो बायडन यांनी केला. चीनने ज्या बेटावर दावा केला आहे त्याचे रक्षण अमेरिकन सैन्य करतील का, असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला होता. बायडन यांनी हो असे उत्तर दिले. तैवानबाबत अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिका लष्करातही हस्तक्षेप करण्यास तयार आहे, असेही बायडेन यांनी त्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com